*सह्याद्री कोकण सामाजिक संस्था पुणे तर्फे सामाजिक दिवाळी साजरी*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*सह्याद्री कोकण सामाजिक संस्था पुणे तर्फे सामाजिक दिवाळी साजरी*
*सह्याद्री कोकण सामाजिक संस्था पुणे तर्फे सामाजिक दिवाळी साजरी*
पुणे(प्रतिनिधी):-12 ऑक्टोबर 2025 रोजी म्हणजे दिवाळीच्या 8 दिवस अगोदर संस्थेने अशा बंधू भगिनींसोबत दिवाळी साजरी केली की ते त्यांची दिवाळी त्यांच्या मनाप्रमाणे करू शकत नाहीत. सामाजिक कार्य म्हटलं की आपल्या आनंदाच्या आधी आपल्यामुळे कुणाला आनंद मिळेल याचा विचार करणे. संस्थेने यावर्षी श्री छत्रपती प्रतिष्ठान पुणे संचालित निवासी मतिमंद विद्यालय, हिंगणे खुर्द, पुणे. आणि नवरत्न ओल्ड एज होम वडगाव, पुणे. या दोन्ही ठिकाणी लहान मुले आणि वयोवृद्ध माऊलींच्या सहवासात आपली दिवाळी फराळ वाटप करुन साजरी केली आणि त्यांचा आनंद द्विगुणित करण्याचा छोटासा प्रयत्न केला. त्यावेळी संस्थेचे सर्व सभासद उपस्थित होते. तसेच दोन्ही संस्थाचे संस्थापक कार्यकारिणी यांनी या उपक्रमास मोलाचे सहकार्य केले.