*अस्तंबा यात्रेतील मृतांना राज्य सरकारने दहा लाखाची मदत जाहीर करावी, आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे मागणी*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*अस्तंबा यात्रेतील मृतांना राज्य सरकारने दहा लाखाची मदत जाहीर करावी, आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे मागणी*
*अस्तंबा यात्रेतील मृतांना राज्य सरकारने दहा लाखाची मदत जाहीर करावी, आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे मागणी*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार जिल्हयातील सातपुडा पर्वत रांगेत असलेल्या अस्तंबा ऋषर्षीची यात्रा करुन घरी परतत असतांना, झालेल्या भिषण अपघातामध्ये नंदुरबार तालुक्यातील 8 मयतांना प्रत्येकी 10 लाख रुपये मदत जाहीर करण्याबाबतची मागणी नंदुरबार विधान परिषदेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. नंदुरबार जिल्हयातील धडगांव तालुक्यात सातपुडा पर्वत रांगेत अस्तंबा येथे दरवर्षी दीपोत्सवानिमित्त धनत्रयोदशीला 4 ते 5 दिवस अश्वत्थामा ऋषींची यात्रा भरत असते. येथे महाराष्ट्र राज्यतुन तसेच गुजरात व मध्यप्रदेश या राज्यातुन हजारोंचा संख्येने भावीक अश्वत्थामा ऋषींच्या दर्शनासाठी यात्रेत येत असतात, धनत्रयोदशींचा दिवशी सकाळी 10 वाजेचा दरम्यान अस्तंबा येथुन भावीक दर्शन घेऊन परतत असतांना चांदसैली घाटात पिकअप वाहनाचा भिषण अपघात झाला व त्या अपघातात नंदुरबार तालुक्यातील पवन गुलाब मिस्तरी, राहुल गुलाब मिस्तरी, चेतन पावबा पाटील, भुषण राजेंद्र गोसावी, रामेश्वर छगन धनगर सर्व रा. घोटाणे तसेच योगेश लक्ष्मण ठाकरे, हिरालाल जगन भील, रा. कोरीट व संजय भिलाव रा. नंदुरबार या 8 तरुणांचा जागीच मृत्य झाला. या अपघातामुळे मृतांचा कुटुंबांवर दुखांचा डोंगर कोसळला असून, घरातील कर्ता पुरुष गेल्याने आर्थिक संकट देखील कुटूंबावर आले आहे. त्या अनुषंगाने नंदुरबार विधान परिषदेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे. नंदुरबार जिल्हयातील सातपुडा पर्वत रांगेत असलेल्या अस्तंवा ऋषींची यात्रा करुन घरीत परतत असतांना झालेल्या भिषण अपघातामध्ये मरण पावलेल्या 8 मयत भावीकांना प्रत्येकी 10 लाख रुपये मदत जाहीर करावी अशी मागणी नंदुरबार विधानपरिषदेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.