*शालिनी जयंत नटावदकर प्राथमिक विद्यामंदिरात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*शालिनी जयंत नटावदकर प्राथमिक विद्यामंदिरात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा*
*शालिनी जयंत नटावदकर प्राथमिक विद्यामंदिरात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा*
नंदूरबार(प्रतिनिधी):-15 ऑक्टोबर रोजी शालिनी जयंत नटावदकर प्राथमिक विद्यामंदिर, नंदुरबार येथे भारताचे माजी राष्ट्रपती व देशाचे मिसाईल मॅन डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. प्रसंगी शाळेचे शिक्षक महेश साठे यांनी डॉ. कलाम यांच्या विषयी थोडक्यात व सुंदर माहिती सांगितली तसेच शाळेचे आदरणीय मुख्याध्यापक सुनील खैरनार यांनी डॉ. कलाम यांचा जीवन वृत्तांत सांगून विद्यार्थ्यांना संबोधित केले व कलाम यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन केले. प्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्रीराम मगर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रणाली बोरकर, तरुलता कुलकर्णी, दिपाली पाटील, रंजीता वळवी, पुनम बागुल, मिनल पाटील, मोनिका नेरे, अंकिता पाटील, दिव्या पवार, कविता ठाकरे, निलेश पाटील आदि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मोलाचे सहकार्य केले.