*राज्यपाल नियुक्त नामनिर्देशनाच्या अनुषंगाने श्रीपाद नाईक, नवीन तसेच नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री यांना निवेदन*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*राज्यपाल नियुक्त नामनिर्देशनाच्या अनुषंगाने श्रीपाद नाईक, नवीन तसेच नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री यांना निवेदन*
*राज्यपाल नियुक्त नामनिर्देशनाच्या अनुषंगाने श्रीपाद नाईक, नवीन तसेच नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री यांना निवेदन*
मुंबई(प्रतिनिधी):-तिमिरातूनी तेजाकडे या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील राज्यपाल नियुक्त नामनिर्देशनच्या अनुषंगाने रिक्त 5 जागांसाठी राज्यपालांना तसेच भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कार्यालयास 673 पानांचा प्रस्ताव प्रस्तुत करण्यात आला होता. या प्रस्तावात सत्यवान यशवंत रेडकर यांचे शिक्षण, समाजकार्य व कला या श्रेणीतून राज्यपाल नियुक्त नामनिर्देशन व्हावे यासाठी मागणी करण्यात आली आहे. सदर प्रस्तावासोबत महाराष्ट्रातील नामांकित विविध समाजातील सामाजिक संस्था व मंडळ यांची शिफारस पत्र सुद्धा संलग्न करण्यात आली होती. महाराष्ट्रातील असंख्य नागरिकांनी मुख्यमंत्र्यांना स्वतंत्रपणे ईमेल व पत्राच्या माध्यमातून सुद्धा वैयक्तिक निवेदन सादर केले आहेत. अद्यापही या पाच जागांबाबत निर्णय झालेला नाही. या विषयाच्या अनुषंगाने तिमिरातूनी तेजाकडे या सामाजिक संस्थेच्या वतीने श्रीपाद नाईक, नवीन तसेच नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री यांस राहत्या निवासस्थानी प्रत्यक्ष भेटून केंद्रात तसेच राज्यात पाठपुरावा करण्यासाठी निवेदन सादर करण्यात आले. यावेळी महाराष्ट्रातील पाच रिक्त जागांसाठी राज्यपाल नियुक्त नामनिर्देशनच्या अनुषंगाने पाठपुरावा करण्यासंदर्भात तसेच पेडणे, म्हापसा व अन्य तालुक्यातील विद्यार्थ्यांना शासकीय स्पर्धा परीक्षेच्या अनुषंगाने मोफत मार्गदर्शन करून जास्तीत जास्त विद्यार्थी प्रशासकीय सेवेत कसे स्थानापन्न करता येईल यासाठी चर्चा करण्यात आली. यावेळी महाराष्ट्रातील उच्चविद्याविभूषित, स्पर्धा परीक्षा व्याख्याते, सत्यवान यशवंत रेडकर (संस्थापक, तिमिरातुनी तेजाकडे), सचिन यशवंत रेडकर (अध्यक्ष) तसेच मेघश्याम मयेकर (सामाजिक कार्यकर्ते) उपस्थित होते.