*युट्यूबवर वेळोवेळी प्रक्षोभक व्हिडीओ प्रसारित करुन सामाजिक शांतता बिघडविणारा पोलीसांच्या अटकेत, घडलेल्या घटनेची योग्य माहिती न घेता बनारस येथून करत होता प्रक्षोभक पोस्ट्स*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*युट्यूबवर वेळोवेळी प्रक्षोभक व्हिडीओ प्रसारित करुन सामाजिक शांतता बिघडविणारा पोलीसांच्या अटकेत, घडलेल्या घटनेची योग्य माहिती न घेता बनारस येथून करत होता प्रक्षोभक पोस्ट्स*
*युट्यूबवर वेळोवेळी प्रक्षोभक व्हिडीओ प्रसारित करुन सामाजिक शांतता बिघडविणारा पोलीसांच्या अटकेत, घडलेल्या घटनेची योग्य माहिती न घेता बनारस येथून करत होता प्रक्षोभक पोस्ट्स*
नंदूरबार(प्रतिनिधी):-काही दिवसांपूर्वी नंदुरबार शहरात जयेश वळवी नामक युवकाची वैयक्तिक वादातून झालेल्या हत्येच्या निषेधार्थ नंदुरबार शहरात 24 सप्टेंबर 2025 रोजी होणाऱ्या मूक मोर्चाच्या अनुषंगाने राहूल रमेश पावरा, रा.बोरवण, ता.धडगाव, जि. नंदुरबार याने 21 सप्टेंबर 2025 रोजी बनारस, उत्तर प्रदेश येथुन त्याच्या युट्यूब चॅनलवर सदर घटनेबाबतची योग्य माहिती न घेता अपुर्ण, चुकीची व लोकांच्या भावना भडकवणारी व्हिडीओ बनवून प्रसारित केली होती, त्याअन्वये सदर इसमाविरुध्द धडगाव पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 173/2025 भा. न्या. संहिता कलम 192, 196(1)(a) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी राहूल पावराने प्रसारित केलेल्या चुकीच्या व समाजात तेढ निर्माण करणारा व भडकवणारा व्हिडीओ हा मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. त्यानंतर 24 सप्टेंबर 2025 रोजी नंदुरबार शहरात झालेल्या मूक मोर्चाला हिंसक वळण लागले व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता.
त्यानंतर देखील आरोपी राहूल पावरा हा वर नमुद घटनेबाबत वेळोवेळी विविध सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवर कायदा व सुव्यवस्था निर्माण होण्यास कारणीभूत ठरतील असे प्रक्षोभक, गैरसमज व खोटी माहिती पसरविणाऱ्या व्हिडीओ प्रसारित करीत होता. वर नमूद कृतीचे अनुषंगाने नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे दाखल गु.र.नं. 583/2025 भा. न्या. संहिता कलम 61(2), 109(1) वगैरे मधील गुन्हयात सदर आरोपीस अटक करण्यात आली असुन त्यास न्यायालयाकडून 2 दिवस पोलीस कोठडी व नंतर न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. तरी गुन्हयाचा पुढील अधिक तपास सुरू आहे."नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे आवाहन करण्यात येते की, नागरिकांनी घडलेल्या घटनेबाबत योग्य माहिती घेऊन सोशल मिडीयावर जबाबदारीने व्यक्त व्हावे, तसेच आपल्या वक्तव्य/कृतीमुळे दोन समाजात किंवा जाती जातीत तेढ निर्माण होऊन सामाजिक शांतता भंग होईल अशी कोणतीही अनुचित पोस्ट/व्हिडिओ वायरल करु नये. तसेच गुन्हेगारीला प्रोत्साहन देणाऱ्या व्हिडीओ प्रसारित करु नये, अन्यथा संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल. याची नोंद घ्यावी."