*मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य*
*मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य*
मुंबई(प्रतिनिधी):-महाराष्ट्रात लवकरच होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विरोधी पक्षांच्या उच्च स्तरीय शिष्टमंडळाने 14 ऑक्टोबर 2025 रोजी मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांची भेट घेउन मतदार याद्या संदर्भात निवेदन दिलेले आहे. त्याच प्रमाणे विविध मुद्यांवर चर्चा केलेली आहे. त्या अनुषंगाने तसेच मागील 02 दिवसांत विविध वर्तमानपत्रात तसेच सामाजिक माध्यमांवर प्रसिध्द होणाऱ्या वृतांच्या अनुषंगाने राज्यातील मतदारांच्या मनामध्ये संभ्रम असू नये याकरिता खालील बाबी स्पष्ट करण्यात येत आहे-
भारत निवडणूक आयोग व राज्य निवडणूक आयोग.
भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 324 नुसार देशातील संसदेच्या, राज्यातील विधानमंडळांच्या तसेच राष्ट्रपती व उप राष्ट्रपतीच्या निवडणूका घेणे व त्यासाठी मतदार यादी तयार करणे याच्या अधिक्षण, निर्देशन व नियंत्रणाचे काम भारत निवडणूक आयोगावर सोपविण्यात आलेले आहे. लोकप्रतिनिधीत्व अधिनियम, 1950 च्या कलम 13-ए नुसार भारत निवडणूक आयोगाकडून प्रत्येक राज्यामध्ये वरील निवडणूकांच्या व मतदार याद्यांच्या पर्यवेक्षणासाठी मुख्य निवडणूक अधिकारी यांची नियुक्ती करण्यात येते. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 243 के व 243 झेड ए अन्वये राज्यातील स्थानिक स्वराज्या संस्थांच्या निवडणूकांसाठी मतदार याद्या तयार करणे व या निवडणूकांच्या आयोजन करण्यासाठी अधिक्षण, निर्देशन व नियंत्रणाचे काम प्रत्येक राज्याच्या राज्य निवडणूक आयोगाकडे सोपविण्यात आलेले आहे. उपरोक्त घटनात्मक तरतूदी पाहता भारत निवडणूक आयोग व राज्य निवडणूक आयोग या दोनही स्वतंत्र घटनात्मक संस्था आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकांसाठी वापरण्यात येणाऱ्या मतदार याद्या.
संविधानातील तरतूदी नुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांसाठी मतदार याद्या तयार करण्याची जबाबदारी राज्य निवडणूक आयोगावर सोपविण्यात आलेली असली तरी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधिनियमातील तरतूदीनुसार, भारत निवडणूक आयोगाकडून विधानसभा मतदार संघासाठी तयार केलेल्या मतदार याद्या राज्य निवडणूक आयोग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांसाठी प्रभाग निहाय विभागून व अधिप्रमाणित करुन वापरतो. मात्र, कोणत्या दिनांकाची मतदार यादी वापरावी याबाबतचा सर्वस्वी निर्णय राज्य निवडणूक आयोगाचा असतो. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांकरिता राज्य निवडणूक आयोगाने 1 जुलै 2025 पर्यंत अद्यावत असलेल्या विधानसभा मतदार संघाच्या मतदार याद्या भारत निवडणूक आयोगाकडून उपलब्ध करुन घेतलेल्या आहेत. त्या याद्या प्रभाग निहाय विभागून राज्य निवडणूक आयोगाने प्रसिध्द केलेल्या आहेत.
भारत निवडणूक आयोगाकडून तयार करण्यात आलेल्या विधानसभा मतदार संघांच्या मतदार याद्या व निरंतर अद्यावतन प्रक्रिया.
यापूर्वी सन 2002 मध्ये विधानसभा मतदार संघांच्या मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरिक्षण (Special Intensive Revision) करण्यात आलेले आहे. त्या नंतर प्रत्येक वर्षी या मतदार याद्यांचे विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (Special Summary Revision) करण्याचा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाकडून राबविण्यात येतो. त्यामध्ये उपलब्ध यादी प्रारुप स्वरुपात प्रसिध्द करण्यात येते व त्यावर दावे व हरकती घेण्यासाठी पुरेसा कालावधी उपलब्ध दिला जातो. प्राप्त दावे व हरकती वर निर्णय घेतल्यानंतर अंतिम याद्या प्रसिध्द करण्यात येतात. प्रारूप तसेच अंतिम मतदार याद्यांच्या प्रती मान्यताप्राप्त राजकीय पक्षांना मोफत देण्यात येतात व इतर राजकीय पक्ष तसेच वैयक्तिकरित्या विक्री तत्वावर उपलब्ध करुन देण्यात येतात.
त्याचप्रमाणे भारत निवडणूक आयोगाच्या अखत्यारीतील (लोकसभा/विधानसभा) निवडणूकांपूर्वी सुद्धा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण घेण्यात येते व राजकीय पक्ष तसेच अन्य व्यक्तिंना मतदार याद्यांमध्ये असलेल्या नोंदीबाबत दावे व हरकती घेण्यासाठी संधी उपलब्ध करुन देण्यात येते. सन 2024 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणूकीपूर्वी (ऑक्टोबर-2023 ते जानेवारी-2024) व विधानसभा निवडणूकीपूर्वी (जुलै-2024 ते ऑगस्ट-2024) विशेष संक्षिप्त पुनरिक्षण घेण्यात आले होते व त्या कालावधीत प्रारुप व अंतिम याद्या राज्यातील सर्व राजकीय पक्षांना मोफत उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. तसेच त्या कालावाधीत राजकीय पक्ष तसेच अन्य व्यक्तिंना मतदार याद्यांमध्ये असलेल्या नोंदीबाबत दावे व हरकती घेण्यासाठी पुरेसा कालावधी संधी उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. त्या व्यतिरिक्त विधानसभा सार्वत्रिक निवडणूका-2024 साठीचे उमेदवार निश्चित झाल्यानंतर सर्व निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना निवडणूकीसाठीच्या अद्यावत मतदार याद्या ऑकटोबर- नोव्हेंबर-2024 मध्ये उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. ऑक्टोबर 2024 नंतर विधानसभा मतदारसंघाच्या मतदारयाद्यांच्या संक्षिप्त पुनेक्षणाचा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेला नसला तरी नोव्हेंबर 2024 ते सप्टेंबर 2025 या कालावधीतील प्रत्येक महिन्यामध्ये प्रत्येक मतदारसंघात झालेले समावेशन, वगळणी तसेच दुरुस्त्या यांची संक्षिप्त माहिती भारत निवडणूक आयोगाने विहित केलेल्या प्रपत्र मध्ये मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र यांच्या संकेत स्थळावर (https://ceoelection.maharashtra.gov.in/ceo/Electors.aspx येथे) उपलब्ध करून देण्यात आलेली आहे व याबाबत मान्यता प्राप्त राजकीय पक्षांना पत्राद्वारे कळविण्यात आलेले आहे. भारत निवडणूक आयोगाकडून राबविण्यात येणाऱ्या विशेष पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत तयार करण्यात आलेल्या विधानसभा मतदारसंघांच्या मतदार याद्यांमध्ये नावे अंतर्भूत करणे, नावे वगळणे किंवा यादीमधील नोंदीमध्ये सुधारणा करणे ही प्रक्रिया विशेष पुनरिक्षण
कार्यक्रम संपल्यानंतरही निरंतर चालू असते. आजमितीसही विधानसभा मतदार संघांच्या याद्यांमध्ये ऑफलाईन तसेच ऑनलाईन पद्धतीने भारत निवडणूक आयोगाने विहित केलेले अर्ज भरुन विधानसभा मतदार याद्यांमध्ये सुधारणा करण्याची प्रक्रिया चालू आहे. एखाद्या विधानसभा मतदार संघातील कोणत्याही मतदारास त्या मतदार संघाच्या यादीतील अन्य मतदार संघातील मतदारांच्या समावेशनाबात आक्षेप असल्यास मतदार नोंदणी नियम 1960 मध्ये नमूद केलेल्या प्रपत्र-7 मध्ये संबंधित मतदार नोंदणी अधिकारी यांच्याकडे अर्ज करता येईल. तसेच, एखाद्या मतदाराच्या यादीतील नोंदी उदा. नाव, वय, पत्ता, फोटो, इ. चुकीच्या असल्याचे आढलल्यास त्या दुरुस्त करुन घेण्यासाठी संबंधित मतदार स्वतः प्रपत्र-8 मध्ये अर्ज करुन त्या चुका दुरुस्त करुन घेऊ शकतो. ऑन-लाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या VOTERS' SERVICE PORTALवर (संकेतस्थळ https://voters.eci.gov.in/) ही सुविधा उपलब्ध आहे. राजकीय पक्षानी उपस्थित केलेल्या तसेच विविध वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या विधानसभा मतदार संघाच्या मतदार याद्यांमधील त्रुटीसंदर्भात वस्तुस्थितीदर्शक जोडपत्र सोबत जोडले आहे.