*चावरा स्कूलच्या एंजल गायकवाडची राष्ट्रीय रोलबॉल स्केटिंग स्पर्धेसाठी निवड*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*चावरा स्कूलच्या एंजल गायकवाडची राष्ट्रीय रोलबॉल स्केटिंग स्पर्धेसाठी निवड*
*चावरा स्कूलच्या एंजल गायकवाडची राष्ट्रीय रोलबॉल स्केटिंग स्पर्धेसाठी निवड*
नंदुरबार(प्रतिनिधी):-येथील चावरा पब्लिक स्कूलची खेळाडू एंजल रणजित गायकवाड हिची आग्रा येथे होणार्या राष्ट्रीय रोलबॉल स्केटिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. पुणे येथे राज्यस्तरी सब ज्युनिअर रोलबॉल स्केटिंग स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत नंदुरबार येथील एंजल रणजित गायकवाड या विद्यार्थिनीने कांस्यपदक प्राप्त केले आहे. म्हणून एंजल गायकवाड हीने उत्कृष्ट कामगिरी केल्याने तिची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. आग्रा येथे दि.24 ते 28 ऑक्टोंबर 2025 दरम्यान राष्ट्रीय रोलबॉल स्केटिंग स्पर्धा होणार आहे. या राष्ट्रीय स्पर्धेसाठी एंजल गायकवाड या खेळाडूचा चावरा पब्लिक स्कूलचे मुख्याध्यापक फादर टेनी परक्का, उपमुख्यध्यापक सिस्टर जेसलीन, ऍडमिनिस्टेट फादर रेमी वडकन, जनरल कॉर्डिंनेटर सिस्टर दिव्या, सेक्शन कॉर्डिंनेटर हर्षदा गुरव, सेक्रेटरी शितल पाटील यांनी सत्कार केला. खेळाडूला क्रीडा शिक्षक संदिप खलाणे, प्रकाश मिस्तरी, प्रशिक्षक नंदु पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.