*नंदुरबार तालुका विधायक समिती, साधना विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय,शनिमांडळ तालुका जिल्हा नंदुरबार येथे फराळ वाटप*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदुरबार तालुका विधायक समिती, साधना विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय,शनिमांडळ तालुका जिल्हा नंदुरबार येथे फराळ वाटप*
*नंदुरबार तालुका विधायक समिती, साधना विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय,शनिमांडळ तालुका जिल्हा नंदुरबार येथे फराळ वाटप*
नंदुरबार(प्रतिनिधी):-साधना विद्यालय येथील विद्यार्थ्यांना दिवाळी सणानिमित्ताने फराळ वाटप (आनंदाचा शिधा), साधना विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय शनिमांडळ येथील संपूर्ण विद्यार्थ्यांना शाळेच्या वतीने दिवाळी सणानिमित्ताने आनंदाचा शिधा म्हणजे फराळाचे वाटप करण्यात आले. या वाटपासाठी शनिमांडळ पंचक्रोशीतील माजी विद्यार्थी व या पंचक्रोशीतील प्रमुख मंडळी डॉक्टर सयाजीराव मोरे, जितेंद्र पवार, संतोष महाराज, अरुण पाटील, संतोष मोरे, दिग्विजय राजपूत, हिरामण तात्या, संतोष धनगर, भगवान पाटील व आनंदा भाऊसाहेब या सर्वांच्या शुभ हस्ते या दिवाळीच्या सणानिमित्ताने विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना व शिक्षकांना चिवडा, शंकरपाळे, चकल्या इत्यादी फराळाचे पाकीट देण्यात आले. यावेळेस माजी विद्यार्थी इंजिनीयर दिग्विजय राजपूत यांनी शाळेसाठी माईक व स्पीकर हे भेटवस्तू दिले. मुख्याध्यापक तथा प्राचार्य कुंदन पाटील यांनी विद्यार्थ्यांना सण आनंदाने जावो, प्रत्येकाच्या घरी फराळ पोहोचा व दिवाळीची सुट्टी आनंदाने जावो , सण परिवारा सकट साजरी करून व गोड शंकरपाळे विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना खाऊ घालून त्यांच्या नमस्कार करू अशी गोड संकल्पना मुख्याध्यापकांनी आपल्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना दिली.
त्यानंतर डॉक्टर सयाजीराव मोरे यांनी विद्यार्थ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देत मुख्याध्यापकांचे कौतुक सुद्धा केले. या कार्यक्रमा वेळी सूत्रसंचालन पर्यवेक्षक पि यू आव्हाड यांनी केले.