*रोटरी क्लब नंदुरबारचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न. नवनिर्वाचित अध्यक्ष रोटेरियन देवेंद्र उपासनी यांची निवड*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*रोटरी क्लब नंदुरबारचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न. नवनिर्वाचित अध्यक्ष रोटेरियन देवेंद्र उपासनी यांची निवड*
*रोटरी क्लब नंदुरबारचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न.नवनिर्वाचित अध्यक्ष रोटेरियन देवेंद्र उपासनी यांची निवड*
नंदुरबार(प्रतिनिधी):-रोटरी डिस्ट्रिक्ट 3060 अंतर्गत रोटरी क्लब नंदुरबारच्या वर्ष 2026-27 च्या नवीन कार्यकारिणीचा पदग्रहण समारंभ 26 जुलै रोजी चावरा स्कूल नंदुरबार येथे उत्साहात पार पडला. यावेळी रोटेरियन देवेंद्र उपासनी यांनी अध्यक्षपदाची, तर रोटेरियन करनसिंग गिरासे यांनी सचिवपदाची सूत्रे स्वीकारली. नव्या कार्यकारिणीतील संचालक मंडळाचाही पदग्रहण सोहळा यावेळी संपन्न झाला.
समारंभासाठी पीडीजी आशिष अजमेरा(ईएमजीएरोटरी इंटरनॅशनल) यांनी स्थापना अधिकारी म्हणून उपस्थिती लावली. तसेच भाजप जिल्हाध्यक्ष निलेश माळी, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अभिजितजी मोरे, सहायक राज्यपाल सौरभ मुनोट आणि भाजप ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष
मनोज गायकवाड, हे प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
नवनिर्वाचित अध्यक्ष रोटेरियन देवेंद्र उपासनी यांनी समाजोपयोगी उपक्रम, शिक्षण, आरोग्य, पर्यावरण संवर्धन आणि सेवा प्रकल्प अधिक प्रभावीपणे राबविण्याचा संकल्प व्यक्त केला. उपस्थित मान्यवरांनी नव्या कार्यकारिणीचे अभिनंदन करून आगामी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व नियोजन क्लबच्या सदस्यांनी केले. पदग्रहण समारंभानंतर सर्व उपस्थितांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले. मागील वर्षाचे अध्यक्ष रोटेरियन फादर टेनी, सचिव रोटेरियन सुनील सोनार यांचे ही स्वागत करण्यात आले.



