*तोरणमाळ येथे अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमशा पाडवी यांच्याहस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*तोरणमाळ येथे अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमशा पाडवी यांच्याहस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन*
*तोरणमाळ येथे अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमशा पाडवी यांच्याहस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-अक्कलकुवा –अक्राणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमश्या पाडवी यांच्या शुभहस्ते आज
तोरणमाळ येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन संपन्न झाले. यावेळी शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पराडके, शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश पराडके, प्रा दिनेश खरात, रवींद्र पराडके, संदीप वळवी पंचायत समिती बांधकाम उप अभियंता बबन पावरा, राकेश पावरा, हुजेफा बलोच आदी मान्यवर उपस्थित होते, यावेळी यशवंत तलाव रिंग रोडचे डांबरीकरण, एमटीडीसी (MTDC) विश्राम गृह आवाराची संरक्षक भिंत बांधकाम, पर्यटन स्थळी डेकोरेटिव्ह लाईट बसविणे,
पर्यटन स्थळी पर्यटकांना बसण्यासाठी ओटे बांधणे आदी विकासकांचे भुमिपुजन करण्यात आले,
याप्रसंगी शिवसेना पक्षाचे सर्व पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, महिला आघाडी, युवा सेना, युवती सेना तसेच शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.