*कुसुंब्यात वर्षायोगासाठी झाले आर्यिका माताजी महाराजांचे जल्लोषात स्वागत, लेझीम पथक कुंभकलश धारी महिला भक्तीभावात रमले नगरवासी
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*कुसुंब्यात वर्षायोगासाठी झाले आर्यिका माताजी महाराजांचे जल्लोषात स्वागत, लेझीम पथक कुंभकलश धारी महिला भक्तीभावात रमले नगरवासी
*कुसुंब्यात वर्षायोगासाठी झाले आर्यिका माताजी महाराजांचे जल्लोषात स्वागत, लेझीम पथक कुंभकलश धारी महिला भक्तीभावात रमले नगरवासी*
कुसुंबा(प्रतिनिधी):-निस्पृह वृत्तीच्या आचार्य सुविधीसागर मुनीश्री यांचे परम शिष्या गणिनी आर्यिकारत्न प.पु. सुयोगमती माताजी सहा तपस्वी आणि दोन महाराज असे आठ त्यांगीवृंदांचे खान्देशातील एकमेव क्षेत्र कुसुंबा प्राचीन जैन अतिशय क्षेत्रावर मजल दरमजल करीत शेकडोमैल पदयात्रा करून अहिंसाचा संदेश देत त्यांनी जैन धर्माची पताका देशभर फडकवली आहे. अशा तपस्वी वृंदांचे क्षेत्रावर वरूणयोगासाठी कुसुंब्यात स्थिरावले आहेत. त्यांच्या आगमन प्रसंगी लेझीम पथक सहकुंभ कलशधारी महीला धर्मध्वज धरून चालणारे चैत्य क्षृतकुमार जैन आणि गंधर्व मयूर जैन बँड तसेच भक्तीगीत सादर करून जैन बांधवांसह ग्रामस्थांनी त्यांची जल्लोषात स्वागत केले. सकाळी चौगावहून तपस्वींचे आगमन प्रसंगी प्रथम कर्णबधीर मूकबधिर शाळेचे विद्यार्थी यांनी महाराज माताजी यांचे टाळ्यांच्या गजराने आनंद व्यक्त करून स्वागत केले. त्यावेळी संस्थेचे प्राचार्य दिलीप झुलाल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. मुकबधीर शाळेपासून सुरू झालेल्या स्वागत मिरवणुकीत लेझीम पथक, केसरी वस्र प्रदान केलेल्या महिला, सफेद वस्र परिधान केलेले पुरुष वर्ग, जयघोषाच्या गजरात जयजयकार करत तपस्वींना अगत्यपूर्वक आणण्यात आले. लेझीम नृत्य सादर करून अनेक कला कौशल्य दाखवत उपस्थितांचे यांचे मने जिंकली. लेझीम पथकाने कुसुंबाकरांचे लक्ष वेधले होते. विविध ठिकाणावून जैन समाज बांधवांनी उपस्थिती दर्शवली होती. तसेच आपल्या नगरात यावर्षी खान्देशातील केवळ कुसुंबा गावातच आठ तपस्वींचे चातुर्मास संपन्न होणार यासाठी आवर्जून सासरी केलेल्या मुली माहेरी आल्या तसेच नोकरीसाठी विखुरला समाज बांधवांनी जन्मभुमीच्या गावात येऊन स्वागत प्रसंगी उपस्थिती मोठ्या प्रमाणावर दर्शवली होती. अशी माहिती खान्देश जैन समाजाचे प्रसिद्धी प्रमुख प्राचीन क्षेत्राचे विश्वस्त सतीश वसंतीलाल. जैन आणि महेंद्र हिरालाल जैन यांनी दिली. स्वागत मिरवणूक विविध मार्गावरून निघून क्षेत्रावर विसर्जित झाली. तेथे अभिषेक प्रवचन संपन्न झाले. नागरिकांनी माताजींचे सहसंघाचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. येथील गली नंबर 3 मधील त्यागी भुवनात तपस्वींचे मंगल प्रवचन व विचारांची पर्वणी लाभणार आहे. चातुर्मास काळात ज्ञानार्जन, आत्मबल, वाढविण्यासाठी वर्षायोग (चातुर्मास) प्रेरणादायी असतो. मानवी जीवनात पवित्र्य फुलविणारा वर्षायोग म्हणूनही याकडे पाहिले जाते. जे दैनंदिन तपस्या करू शकत नाही ते तपस्या चातुर्मासात पूर्ण होते आत्मशुद्धी व ज्ञानार्जनाचा योग साधण्यासाठी हा काळ अनमोल असतो चातुर्मासासाठी प.पु. गणिनी तपस्वी आर्यिकारत्न सुयोगमती माताजी, प.पु. आर्यिका शितलमती माताजी, प.पु. आर्यिका सुदिव्यमती माताजी, प.पु. क्षुल्लक सुसम्य सागरजी महाराज, प.पु. क्षुल्लक सुचिन्नसागर जी महाराज, प.पु. क्षुल्लिका सुगणमती माताजी, प.पु. क्षुल्लिका सुसिद्धमती माताजी या आठ तपस्वीं वृंदांचे नगरात आगमन झाले आहे. क्षेत्रावर सलग सहाव्या चातुर्मासाठी तपस्वींचे अभुतपुर्व स्वागत केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी पार्श्वनाथ सेवा समिती विशेष दक्षता घेत आहे.



