*ठाणे जिल्ह्यात न्यू कळवा हायस्कूलमध्ये व्यसनमुक्ती दिंडीद्वारे जनजागृती, नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य जिल्हा ठाणे उपक्रम*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*ठाणे जिल्ह्यात न्यू कळवा हायस्कूलमध्ये व्यसनमुक्ती दिंडीद्वारे जनजागृती, नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य जिल्हा ठाणे उपक्रम*
*ठाणे जिल्ह्यात न्यू कळवा हायस्कूलमध्ये व्यसनमुक्ती दिंडीद्वारे जनजागृती, नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य जिल्हा ठाणे उपक्रम*
कळवा(प्रतिनिधी):-नशामुक्त भारत अभियानांतर्गत आषाढी एकादशीच्या निमित्ताने गोपाळराव पाटील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित न्यू कळवा हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, कळवा (जिल्हा ठाणे) येथे जिल्हा परिषद ठाणे समाजकल्याण विभाग व नशाबंदी मंडळ, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने व्यसनमुक्ती दिंडी व जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमास नशामुक्त भारत अभियानाचे सदस्य तथा नशाबंदी मंडळ, महाराष्ट्र राज्यचे ठाणे जिल्हा समन्वयक मिलिंद रूपचंद पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी नशाबंदी मंडळ, महाराष्ट्र राज्यचे ठाणे जिल्हा संघटक मिलिंद पाटील यांनी "जीवनाला हो म्हणा, अंमली पदार्थांना नाही म्हणा" हा संदेश देत विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांविषयी मार्गदर्शन केले. "व्यसन सोडा, माणसे जोडा" हा संदेश देत "आम्ही कोणतेही व्यसन करत नाही, तुम्हीही करू नका," असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. तसेच यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की, युवकांमध्ये अंमली पदार्थांविरोधी मानसिकता निर्माण करणे ही काळाची गरज आहे. व्यसनामुळे आरोग्याबरोबरच शिक्षण, व्यक्तिमत्त्व विकास आणि भविष्यातील करिअरवरही गंभीर परिणाम होतात.
कार्यक्रमाच्या प्रारंभी सर्व उपस्थितांना अंमली पदार्थविरोधी शपथ देण्यात आली. त्यानंतर व्यसनमुक्ती दिंडी काढून परिसरात पुढील घोषणांद्वारे जनजागृती करण्यात आली—
"विठ्ठल विठ्ठल गजर करू, व्यसनमुक्त समाज घडवू!"
"हरिनामाचा घ्या आधार, व्यसनाला द्या नकार!"
"वारीचा संदेश घरोघरी, व्यसनमुक्ती प्रत्येक दारी!" "व्यसनमुक्त युवक – राष्ट्राची खरी शक्ती!"
"व्यसनमुक्त भारत – हीच खरी पंढरीची वारी!"
यासोबतच व्यसनमुक्ती विषयक पोस्टर प्रदर्शन भरविण्यात आले तसेच जनजागृतीपर पत्रकांचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमास मुख्याध्यापक दत्तात्रय बिन्नर, ज्युनिअर कॉलेज चे उपप्राचार्य सुभाष जाधव, वरिष्ठ शाळेच्या पर्यवेक्षिका सौ. केदारे, शिरसाट, माने, सौ. उगलमुगले, गवळे, शिक्षकेतर कर्मचारी मंचेकर, तसेच सर्व शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मिलिंद पाटील यांनी सांगितले की, आषाढी एकादशीच्या निमित्ताने ठाणे जिल्ह्यात विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये व्यसनमुक्ती दिंडी, पोस्टर प्रदर्शन आणि जनजागृती पत्रकांचे वाटप करून अंमली पदार्थांविरोधात व्यापक जनजागृती केली जात असून, व्यसनमुक्त समाज घडविण्याचा हा सातत्यपूर्ण प्रयत्न आहे.



