*नांदेड जिल्ह्यातील धनगर समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा ९ ऑगस्ट रोजी भव्य सत्कार सोहळा दहावी, बारावी, जेईई, नीट, नवोदय, शिष्यवृत्ती व विविध स्पर्धा परीक्षांतील यशस्वी विद्यार्थ्यांना सह
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नांदेड जिल्ह्यातील धनगर समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा ९ ऑगस्ट रोजी भव्य सत्कार सोहळा दहावी, बारावी, जेईई, नीट, नवोदय, शिष्यवृत्ती व विविध स्पर्धा परीक्षांतील यशस्वी विद्यार्थ्यांना सह
*नांदेड जिल्ह्यातील धनगर समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा ९ ऑगस्ट रोजी भव्य सत्कार सोहळा दहावी, बारावी, जेईई, नीट, नवोदय, शिष्यवृत्ती व विविध स्पर्धा परीक्षांतील यशस्वी विद्यार्थ्यांना सहभागाचे आवाहन*
नांदेड(प्रतिनिधी):-नांदेड जिल्ह्यातील धनगर समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यासाठी रविवार, 9 ऑगस्ट 2026 रोजी भव्य गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही हा प्रेरणादायी कार्यक्रम कुसुम सभागृह, नांदेड येथे उत्साहात संपन्न होणार असून, जिल्ह्यातील सर्व धनगर समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन नांदेड जिल्हा धनगर गुणवंत विद्यार्थी सत्कार समितीने केले आहे. शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान करून त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव करणे, त्यांचा आत्मविश्वास वाढविणे तसेच इतर विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात शिक्षण, स्पर्धा परीक्षा, करिअर मार्गदर्शन आणि व्यक्तिमत्त्व विकास या विषयांवरील तज्ज्ञांचे मार्गदर्शनही विद्यार्थी व पालकांना लाभणार आहे. या सत्कार सोहळ्यासाठी दहावी व बारावी परीक्षेत 85 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळवलेले विद्यार्थी, नीट परीक्षेत 500 पेक्षा अधिक गुण प्राप्त केलेले विद्यार्थी, जेईई परीक्षेत 85 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवलेले विद्यार्थी, तसेच नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा, इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षा आणि इतर विविध स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केलेले विद्यार्थी पात्र असतील. सहभाग इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी किंवा त्यांच्या पालकांनी 2 ऑगस्ट 2026 पर्यंत आवश्यक माहिती व गुणपत्रिकेची प्रत गुगल फॉर्मद्वारे भरून किंवा मेमो (गुणपत्रिका) अपलोड करून नावनोंदणी करावी. तसेच अधिक माहितीसाठी किंवा नोंदणीसाठी खालील व्हॉट्सअॅप क्रमांकांवर गुणपत्रिकेचा फोटो पाठवावा, असे समितीने कळविले आहे.संपर्क : 98340 91261, 93256 98915, 8308887430, 88302 92842, 99708 44498 नांदेड जिल्ह्यातील धनगर समाजातील सर्व पात्र विद्यार्थ्यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, आपल्या यशाचा गौरव करून घ्यावा आणि समाजातील इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आदर्श ठरावे, असे आवाहन नांदेड जिल्हा धनगर गुणवंत विद्यार्थी सत्कार समितीच्या वतीने करण्यात आले आहे.



