*गुजरभवाली येथे आषाढी एकादशी उत्साहात साजरी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*गुजरभवाली येथे आषाढी एकादशी उत्साहात साजरी*
*गुजरभवाली येथे आषाढी एकादशी उत्साहात साजरी*
नंदुरबार(प्रतिनिधी):-के. डी. गावित प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, गुजरभवाली येथे आषाढी एकादशी भक्तिमय वातावरणात आणि मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये संत परंपरा, वारकरी संप्रदायाचे संस्कार आणि भारतीय संस्कृतीचे महत्त्व रुजविण्याच्या उद्देशाने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
यावेळी विद्यार्थी वारकरी वेशभूषेत शाळेत उपस्थित झाले होते. मुलांनी पांढरा पोशाख, गांधी टोपी, गळ्यात तुळशीची माळ, तर मुलींनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून वारकरी संप्रदायाची सुंदर झलक सादर केली. "ज्ञानोबा- तुकाराम", "पुंडलिक वरदा हरी विठ्ठल" या जयघोषात टाळ -मृदंगाच्या गजरात शाळा परिसरातून भव्य दिंडी काढण्यात आली. दिंडीत विद्यार्थ्यांनी अभंग, भजन आणि नामस्मरण करत विठ्ठल भक्तीचा आनंद अनुभवला.
यावेळी शिक्षकांनी आषाढी एकादशीचे धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांच्या विचारांचे महत्त्व, वारकरी संप्रदायातील समता, बंधुभाव, सेवा आणि भक्तीचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात आला. या कार्यक्रमास विजय वळवी, शरद जाधव, ईश्वर पाटील, संजीव वळवी, शरद मराठे, भानुदास पाटील, रवींद्र पवार, विलास पाटील, हिरालाल पाटील, मनोज पाटील, रवींद्र शिरसाळे, भारती पवार, शिवाजी सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी विद्यार्थ्यांच्या वारकरी वेशभूषेचे व दिंडीतील सहभागाचे कौतुक केले.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.कार्यक्रमाचा समारोप विठ्ठलाच्या नामगजराने आणि सर्वांच्या मंगलकामनेसह करण्यात आला.



