*निवडणुकीत जनतेला ग्राह्य धरू नये-आ.चंद्रकांत रघुवंशी*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*निवडणुकीत जनतेला ग्राह्य धरू नये-आ.चंद्रकांत रघुवंशी*
*निवडणुकीत जनतेला ग्राह्य धरू नये-आ.चंद्रकांत रघुवंशी*
नंदुरबार(प्रतिनिधी):-जिल्ह्याची आणि तालुक्याच्या जनतेची प्रामाणिक सेवा केली आहे. निवडून येणाऱ्या व्यक्तींनाच तिकिटासाठी प्राधान्य देण्यात येईल. ज्यांना निवडणुक लढवायची असेल त्यांनी पक्षाकडे अर्ज करावेत. त्यांच्या नक्की विचार करण्यात येईल. निवडणुकीत जनतेला ग्राह्य धरण्यात येऊ नये. जनता सर्व ओळखून आहे असे प्रतिपादन शिवसेनेचे संपर्कप्रमुख आ. चंद्रकांत रघुवंशी यांनी केले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार तालुक्यातील कोळदा व खोंडामळी येथे शिवसैनिकांचा मेळवा घेण्यात आली त्याप्रसंगी उपस्थितितांना आ. रघुवंशी यांनी मार्गदर्शन केले त्याप्रसंगी ते बोलत होते. पुढ ते म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ह्या कार्यकर्त्यांच्या असतात. आता कार्यकर्त्यांनी त्यांचे कर्तव्य पार पाडायला पाहिजे. पक्षाचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातत्याने सांगत आहेत आमदार, खासदारांच्या निवडणुका गेल्या. कार्यकर्त्यांनी त्यांचे कर्तव्य निवडणुकांमध्ये पार पाडल्यामुळेच राज्यात मोठ्या प्रमाणावर शिवसेनेचे उमेदवार निवडून आले. कार्यकर्त्यांची जरी निवडणूक असली तरी नेत्यांनी त्यांच्यासाठी झटलं पाहिजे. आम्ही जिल्ह्याची आणि तालुक्याच्या जनतेची प्रामाणिक सेवा करीत आहोत. त्याचमुळे ईश्वरी कृपेने कोपर्लीचे आरक्षण ओबीसी पुरुष निघाले. मागील पंचवार्षिक निवडणुकीत एकाच परिवारातील पाच उमेदवारांना तिकीट देण्यात आले. आदिवासी समाजाची प्रामाणिकपणे सेवा केली आहे त्याच्या प्रमाणपत्राची मला कोणाचीही गरज नाही. माजी पं.स सभापती विक्रमसिंह वळवी म्हणाले, माजी आ. बटेसिंग रघुवंशी यांनी जिल्हा परिषद व पंचायत समितीत अनेक आदिवासी समाजातील युवकांना पदाधिकारी म्हणून काम करण्याची संधी दिली. त्यांनी देखील दिलेल्या विश्वासाबद्दल तडा जाऊ दिला नाही. आदिवासींच्या राजकीय जीवनात जसजशी संधी संधी देण्यात आली तसतसे जनतेत राहून काम करून विश्वास संपादन केला. माजी जि.प सदस्य देवमन पवार, कोळदा गटात दोन निवडणुकांमध्ये चुकीचे निर्णयाची खंत असून, आता ग्रामस्थांनी देखील विचार करण्याची गरज आहे. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत पहिल्या टर्मच्या निवडणुकीत गावातला उमेदवाराला पराभूत करीत बाहेरच्या उमेदवाराला विजयी करण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी, माजी जि.प. अध्यक्ष वकील पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख डॉ. सयाजीराव मोरे यांनी देखील मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी शिवसेना पदाधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्थेतील पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.