*सुरगाणा तालुक्यातील खुंटविहीर येथील दिंडीचीबारीमध्ये दुचाकीला बसने मागील बाजूने धडक दिल्याने, दुचाकीस्वार जागीच ठार*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*सुरगाणा तालुक्यातील खुंटविहीर येथील दिंडीचीबारीमध्ये दुचाकीला बसने मागील बाजूने धडक दिल्याने, दुचाकीस्वार जागीच ठार*
*सुरगाणा तालुक्यातील खुंटविहीर येथील दिंडीचीबारीमध्ये दुचाकीला बसने मागील बाजूने धडक दिल्याने, दुचाकीस्वार जागीच ठार*
सुरगाणा(प्रतिनिधी):-बस अपघातात एक जण ठार, नासिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील खुंटविहीर येथील दिंडीचीबारीमध्ये दुचाकीला बसने मागील बाजूने धडक दिल्याने, दुचाकीस्वार जागीच ठार झाला आहे. याबाबत मयताचा भाऊ राजू गावित याने बस चालकाविरुद्ध फिर्याद दिली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिक ते खुंटविहीर बस क्र.एम.एच 14 बी.टी 3339 हि सुरगाणा येथून खुंटविहीर येथे रात्री सव्वा आठच्या सुमारास दिंडीचीबारी हा घाट चढत असतांना, त्या पाठोपाठ मागून दुचाकी क्र. एम. एच 15 जीयू 6358 वरील चालक मयत भास्कर लक्ष्मण गावित वय 40 रा. रानविहीर हा घाटातून जात होता. बारीतील रस्ता एकदम अरुंद असल्याने बसची मागील बाजू दुचाकीला धडकल्यानंतर चालकाच्या डोक्याला जोरदार फटका बसल्याने, नाका तोंडातून रक्त आले. त्यास तात्काळ सुरगाणा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, वैद्यकीय तपासणी केली असता मृत घोषित करण्यात आले. मयत भास्करच्या पश्चात पत्नी, आई, वडील असा परिवार आहे. ऐन दिवाळीत घटना घडल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत दवंगे हे करीत आहेत.
दरम्यान खुंटविहीर दिंडीचीबारी घाटात अरुंद एकेरी वाहतूकीचा रस्ता असून, अनेक वेळा या घाटात अपघाता झाले आहेत. आतापर्यंत दहा ते बारा जणांना जीव गमवावा लागला आहे. रस्ता रुंदीकरण करावे अशी मागणी परिसरातील ग्रामस्थ बाळू गावित, सुरेश पवार, कांतू चौधरी, देवराम काशिनाथ वार्डे, प्रकाश खिराडी, दिनेश बिरारी, मनोहर गावित, राजू गावित, रमेश गावित,
जयवंत राऊत, सिताराम पवार, आनंदा पवार, वसंत वार्डे, रमेश चौधरी, मनोज गावित यांनी केली आहे.