*खुनाच्या गुन्हयातील फरार आरोपीला पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*खुनाच्या गुन्हयातील फरार आरोपीला पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश*
*खुनाच्या गुन्हयातील फरार आरोपीला पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश*
नंदुरबार(प्रतिनिधी):-शहर पोलीस ठाणे येथे दाखल गु.र.नं. 496/2025 भा. न्या. संहिता कलम 103(1) वगैरे गुन्हयातील फरार आरोपी मुकेश राणा प्रकाश राजपुत, वय 37 वर्षे, रा. देसाईपुरा, अमर टॉकीज जवळ, नंदुरबार ता.जि. नंदुरबार याच्यावर नमुद प्रमाणे गुन्हा दाखल असुन सदर आरोपी गुन्हा घडल्यानंतर काही दिवसांपासून फरार होता. जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेकडून सदर गुन्हयाचा समांतर तपास सुरू असतांना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गोपनिय माहिती मिळाली की, आरोपी मुकेश राजपूत हा गुजरात राज्यातील नवसारी येथे आहे, अशी खात्रिशीर माहितीचे आधारे पो.नि हेमंत पाटील यांनी लागलीच स्था.गु.शा. पथकास आरोपीचा शोध घेणेकामी नवसारी (गुजरात) रवाना केले. पथकाने मिळालेल्या गोपनिय माहितीचे आधारे आरोपी मुकेश राजपूत याचा नवसारी येथे जाऊन शोध घेतला असता तो मिळून आल्याने त्यास ताब्यात घेण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळाले आहे. सदर आरोपीला पुढील कायदेशीर कारवाईकामी शहर पोलीस ठाण्यास सुपूर्त करण्यात आले आहे. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार, तसेच सहा. पो. उपनिरीक्षक राकेश वसावे, पोहेकॉ महेंद्र नगराळे, पोना/मोहन ढमढेरे, पोशि/शोएब शेख, अशांनी केली आहे.