*फुटबॉलच्या नवोदित खेळाडूंसाठी सुवर्णसंधी;राज्य शासनाच्या ‘महादेवा’ योजनेअंतर्गत, नंदुरबारमध्ये फुटबॉल निवड चाचणी 30 ते 31 ऑक्टोबरला*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*फुटबॉलच्या नवोदित खेळाडूंसाठी सुवर्णसंधी;राज्य शासनाच्या ‘महादेवा’ योजनेअंतर्गत, नंदुरबारमध्ये फुटबॉल निवड चाचणी 30 ते 31 ऑक्टोबरला*
*फुटबॉलच्या नवोदित खेळाडूंसाठी सुवर्णसंधी;राज्य शासनाच्या ‘महादेवा’ योजनेअंतर्गत, नंदुरबारमध्ये फुटबॉल निवड चाचणी 30 ते 31 ऑक्टोबरला*
नंदुरबार(प्रतिनिधी):-राज्य शासनाच्या महादेवा योजने अंतर्गत जिल्ह्यातील फुटबॉल खेळाडूंना आपली कौशल्यं दाखवण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे आणि वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन (WIFA) यांच्या संयुक्त विद्यमाने, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा फुटबॉल संघटना नंदुरबार यांच्या सहकार्याने ही निवड चाचणी आयोजित करण्यात आली असल्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती सुनंदा पाटील यांनी कळविले आहे.
फुटबॉलच्या माध्यमातून ग्रामीण भागातील खेळाडूंना व्यासपीठ मिळावे, त्यांची प्रतिभा उजेडात यावी आणि त्यांच्या खेळाची दिशा राज्य व राष्ट्रीय स्तराकडे वळावी, या हेतूने 13 वर्षाखालील मुलं आणि मुलींसाठी ही निवड चाचणी 30 व 31 ऑक्टोबर 2025 रोजी जिल्हा क्रीडा संकुल, खामगाव रोड, नंदुरबार येथे होणार आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती सुनंदा पाटील यांनी सांगितले की, “या चाचणीमुळे जिल्ह्यातील उदयोन्मुख खेळाडूंना राज्य पातळीवर आपले नाव गाजवण्याची संधी मिळेल. त्यामुळे इच्छुकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आपल्या क्रीडा स्वप्नांना दिशा द्यावी.”