*सुमारे 11,000 दिव्यांची रोषणाई करीत माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या उपस्थितीत संगमेश्वराची केली महाआरती, हजारो भाविकांनी तापी काठावरील या दीप सोहळ्याचा घेतला आनंद*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*सुमारे 11,000 दिव्यांची रोषणाई करीत माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या उपस्थितीत संगमेश्वराची केली महाआरती, हजारो भाविकांनी तापी काठावरील या दीप सोहळ्याचा घेतला आनंद*
*सुमारे 11,000 दिव्यांची रोषणाई करीत माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या उपस्थितीत संगमेश्वराची केली महाआरती, हजारो भाविकांनी तापी काठावरील या दीप सोहळ्याचा घेतला आनंद*
नंदुरबार(प्रतिनिधी):-प्रकाशा येथील तापी नदी काठावरील संगमेश्वर महादेव मंदिर परिसरात सुमारे 11,000 दिव्यांची रोषणाई करीत माजी आदिवासी विकास मंत्री तथा विद्यमान आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या हस्ते संगमेश्वर महाआरती करण्यात आली. तापी काठावरील या दीप सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक आणि नागरिक उपस्थित होते. तापी आरती सेवा समितीच्या वतीने आज 17 ऑक्टोंबर रोजी बसुबारसच्या दिवशी सायंकाळी सातच्या सुमारास प्रकाशा येथील तापी नदी काठावरील संगमेश्वर महादेव मंदिर परिसरात संगमेश्वर महाआरती करण्यात आली. मंदिर परिसरात 11,000 दिव्यांची रोषणाई करण्यात आली होती. या संगमेश्वर महा आरती ला राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री आमदार डॉ विजयकुमार गावित, जिल्हा परिषदेच्या माजी बांधकाम सभापती हेमलता शितोळे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रामचंद्र पाटील, तापी आरती सेवा समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव सदस्य तसेच सुनील पाटील, विजय पाटील, भाजपा तालुका अध्यक्ष खंडू पाटील, यांच्यासह भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी भजन संध्या तसेच फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. आमदार डॉ विजयकुमार गावित यांनी संगमेश्वर महाआरती प्रसंगी उपस्थित भक्तगणांना दीपावलीच्या शुभेच्छा देत मार्गदर्शन केले.