*शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, बामडोद येथे “सायबर क्राईम आणि मालमत्ता गुन्हे प्रतिबंध” या महत्त्वपूर्ण विषयावर, जनजागृतीवर व्याख्यानाचे आयोजन*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, बामडोद येथे “सायबर क्राईम आणि मालमत्ता गुन्हे प्रतिबंध” या महत्त्वपूर्ण विषयावर, जनजागृतीवर व्याख्यानाचे आयोजन*
*शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, बामडोद येथे “सायबर क्राईम आणि मालमत्ता गुन्हे प्रतिबंध” या महत्त्वपूर्ण विषयावर, जनजागृतीवर व्याख्यानाचे आयोजन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, बामडोद येथे “सायबर क्राईम आणि मालमत्ता गुन्हे प्रतिबंध” या महत्त्वपूर्ण विषयावर जनजागृतीवर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. वाढत्या डिजिटल युगात सायबर गुन्ह्यांची संख्या वाढत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये तसेच नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते पोलिस निरीक्षक दिनेश भदाणे यांनी सायबर गुन्ह्यांचे विविध प्रकार, जसे की फिशिंग, हॅकिंग, ऑनलाईन फसवणूक, सोशल मीडियावरील धोके, तसेच बँक व्यवहारांतील सुरक्षेचे उपाय यांविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना स्वतःची वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवण्याचे महत्त्व पटवून दिले तसेच कोणत्याही सायबर फसवणुकीच्या घटनेत त्वरित पोलिसांकडे तक्रार नोंदविण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंकज चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. त्यांनी आपल्या भाषणात म्हटले की, आजच्या काळात सायबर सुरक्षिततेचे शिक्षण प्रत्येक विद्यार्थ्याने घ्यायला हवे आणि समाजातील प्रत्येक व्यक्तीने डिजिटल जबाबदारीचे पालन करायला हवे.
या प्रसंगी संस्थेच्या अध्यक्ष सौ. योगिता गणेश पाटील, सचिव गणेश गोविंद पाटील, उपस्थित होते. तसेच त्यांनी कार्यक्रमाचे आयोजन यशस्वीरीत्या केल्याबद्दल विद्यार्थ्यांचे व आयोजक मंडळाचे कौतुक केले.
या व्याख्यानामुळे विद्यार्थ्यांमध्ये सायबर गुन्ह्यांविषयी जागरूकता वाढली असून डिजिटल युगात जबाबदार नागरिक म्हणून वावरण्याचा संदेश सर्वांना मिळाला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्राध्यापिका तश्विता मगरे यांनी केले.