*दीपावलीच्या उत्सवाची सुरुवात होत असलेल्या वसुबारस दिनी गाय वासरूच्या शिल्पाचे आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते लोकार्पण*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*दीपावलीच्या उत्सवाची सुरुवात होत असलेल्या वसुबारस दिनी गाय वासरूच्या शिल्पाचे आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते लोकार्पण*
*दीपावलीच्या उत्सवाची सुरुवात होत असलेल्या वसुबारस दिनी गाय वासरूच्या शिल्पाचे आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते लोकार्पण*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार शहरातील महाराणा प्रताप पुतळ्याजवळ बसवण्यात आलेल्या गाय वासरूच्या शिल्पाचे दीपावली सणाची सुरुवात असणाऱ्या वसुबारस दिनी, शिवसेनेचे संपर्कप्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात येणार आहे. गाय आणि वासरू हे आई आणि तिच्या बाळामधील मातृप्रेम आणि संगोपनाचे प्रतीक आहे. गाय वासरूला सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्व असून, शिवसेनेचे संपर्कप्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या संकल्पनेतून शहरातील महाराणा प्रताप पुतळ्याजवळ गाय वासरूचे शिल्प बसवण्यात आले आहे. त्याचे लोकार्पण दीपावली सणाच्या उत्सवाची सुरुवात असलेल्या वसुबारस या दिवशी पहिल्याच दिवशी शिवसेनेचे संपर्कप्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते सायंकाळी 6 वाजता लोकार्पण करण्यात येणार आहे. लोकार्पण कार्यक्रमास सर्व नागरिक, गोरक्षकांनी उपस्थित रहावे असे आवाहन आ. चंद्रकांत रघुवंशी मित्र मंडळाचे उपाध्यक्ष, शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांनी केले आहे.