*शिक्षणात गुणवत्ता आणि संस्कारांचा संगम डी.आय.ई.टी. नंदुरबारचा प्रेरणादायी उपक्रम, प्राचार्य डॉ. रमेश चौधरी व ज्येष्ठ अधिव्याख्याता प्रदीप पाटील यांची काथर्दे खुर्द शाळेस भेट*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*शिक्षणात गुणवत्ता आणि संस्कारांचा संगम डी.आय.ई.टी. नंदुरबारचा प्रेरणादायी उपक्रम, प्राचार्य डॉ. रमेश चौधरी व ज्येष्ठ अधिव्याख्याता प्रदीप पाटील यांची काथर्दे खुर्द शाळेस भेट*
*शिक्षणात गुणवत्ता आणि संस्कारांचा संगम डी.आय.ई.टी. नंदुरबारचा प्रेरणादायी उपक्रम, प्राचार्य डॉ. रमेश चौधरी व ज्येष्ठ अधिव्याख्याता प्रदीप पाटील यांची काथर्दे खुर्द शाळेस भेट*
नंदुरबार(प्रतिनिधी):-जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (D.I.E.T.), नंदुरबारचे प्राचार्य डॉ. रमेश चौधरी व ज्येष्ठ अधिव्याख्याता प्रदीप पाटील यांनी शहादा तालुक्यातील परिवर्धा केंद्रांतर्गत जिल्हा परिषद मराठी शाळा काथर्दे खुर्द येथे अचानक भेट देऊन शैक्षणिक, सांस्कृतिक व भौतिक सुविधा यांचा सखोल आढावा घेतला. संकलित मूल्यमापन चाचणीसंदर्भात मार्गदर्शन या भेटीदरम्यान डॉ. चौधरी यांनी विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधत संकलित मूल्यमापन चाचणीतील प्रश्नपत्रिका सोडवण्याच्या पद्धती, वेळेचे नियोजन आणि उत्तरलेखन कौशल्य याबाबत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना आत्मविश्वास वाढवण्यासाठी त्यांनी प्रेरणादायी विचार मांडले. तसेच शिक्षकांना उद्देशून म्हणाले की, “शिक्षण हे केवळ परीक्षेसाठी नव्हे, तर जीवनासाठी आहे. प्रत्येक शिक्षकाने विद्यार्थी-केंद्रित अध्यापनातून मुलांच्या विचारक्षमता आणि सर्जनशीलतेला वाव द्यावा.” दिवाळी उपक्रमात सहभाग संस्कारशील शिक्षणाची झलक शाळेत चालू असलेल्या दिवाळी उपक्रमांमध्ये आकाशकंदील बनविणे, चित्रकला व रंगभरण स्पर्धा, तसेच दिवाळी फराळ वाटप कार्यक्रमात दोन्ही मान्यवरांनी उत्साहाने सहभाग घेतला. विद्यार्थ्यांच्या आनंदात सहभागी होत त्यांनी उपक्रमांना संस्कारशील शिक्षणाचा भाग मानले आणि शिक्षकांचे अभिनंदन केले. भौतिक सुविधा आणि शैक्षणिक वातावरणाचा सखोल आढावा भेटीदरम्यान शाळेच्या स्वच्छता, शैक्षणिक साहित्य, उपस्थिती नोंद, ग्रंथालय व उपक्रम कोपऱ्यांचे निरीक्षण करण्यात आले.
डॉ.रमेश चौधरी यांनी शाळेच्या एकूण वातावरणाबद्दल समाधान व्यक्त करत सांगितले की,“शाळा म्हणजे शिक्षणाची प्रयोगशाळा आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रत्येक शिक्षकाने सर्जनशीलतेचा अवलंब करणे आवश्यक आहे." मान्यवरांची उपस्थिती या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक विजय सुपडू सोनवणे, उपक्रमशील शिक्षक श्रीकांत वसईकर, तुकाराम अलट, शारदा कडवे, सुरेश निकुंबे आदी आदी शिक्षक बंधू भगिनी उपस्थित होते.
सर्व शिक्षकांनी डी.आय.ई.टी. संस्थेच्या भेटीबद्दल आनंद व्यक्त करून अशा भेटीमुळे शिक्षकांना प्रेरणा आणि दिशा मिळते, असे नमूद केले.
भेटीच्या शेवटी डॉ. रमेश चौधरी व प्रदीप पाटील यांनी सर्व शिक्षक, विद्यार्थी व पालक बांधवांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देत उज्ज्वल भविष्याच्या शुभेच्छा दिल्या.
“संघर्षातच यश दडलेले असते, परंतु योग्य मार्गदर्शनाने प्रत्येक संघर्ष सोपा होतो,” असे सांगून त्यांनी विद्यार्थ्यांना प्रेरित केले. डायट नंदुरबारच्या या भेटीने पुन्हा एकदा सिद्ध केले की, शैक्षणिक गुणवत्ता वृद्धीसाठी केवळ धोरणे नव्हे, तर प्रत्यक्ष शाळास्तरावर होणारा संवाद, सहभाग आणि प्रेरणा यांनाच खरे महत्त्व आहे.
जिल्हा शिक्षण संस्थेच्या अशा उपक्रमांमुळे नंदुरबार जिल्हा निश्चितच गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या दिशेने नवी झेप घेईल, अशी भावना शिक्षकवर्गात व्यक्त झाली. असेही मत शिक्षक तुकाराम अलट यांनी व्यक्त केले.