*सांस्कृतिक कार्य संचालनालय विभागाच्या 'वाद्यरंग' कार्यक्रमात सुरगाण्यातील 17 दुर्मिळ वाद्यकलेचे मनमोहक सादरीकरण*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*सांस्कृतिक कार्य संचालनालय विभागाच्या 'वाद्यरंग' कार्यक्रमात सुरगाण्यातील 17 दुर्मिळ वाद्यकलेचे मनमोहक सादरीकरण*
*सांस्कृतिक कार्य संचालनालय विभागाच्या 'वाद्यरंग' कार्यक्रमात सुरगाण्यातील 17 दुर्मिळ वाद्यकलेचे मनमोहक सादरीकरण*
सुरगाणा(प्रतिनिधी):-सांस्कृतिक कार्य संचालनालय विभागाच्या 'वाद्यरंग' कार्यक्रमात सुरगाण्यातील 17 दुर्मिळ वाद्यकलेचे मनमोहक सादरीकरण केले. या मध्ये आदिम वाद्य वाजविणारे सुरगाणा, मोखाडा, जव्हारचे कलाकारांचा समावेश होता.
आदिम कला वाद्यांची सांस्कृतिक मंत्र्यांनी केली प्रशंसा. सांस्कृतिक कार्य विभाग सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या तर्फे 14 ऑक्टोबर रोजी रविंद्र नाट्य मंदिर प्रभादेवी मुंबई येथे आयोजित 'वाद्यरंग' या राज्यस्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वाद्यरंग कार्यक्रमात
सुरगाणा तालुक्यातील 17 दुर्मिळ व पारंपरिक वाद्य लोककलेचे प्रभावी सादरीकरण रविंद्र नाट्यगृहाच्या मंचावर करण्यात आले. यावेळी सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, सचिव
डाॅ. किरण कुलकर्णी, संचालक बिभीषण चवरे, विधानसभा सदस्य महेश सावंत यांनी भेट देत या कार्यक्रमात आदिवासी भागातील पारंपरिक वाद्यांची सादरीकरणे, नृत्य, ताल आणि लोककथांमधील सूर, वाद्य कलाकृती यांची पाहणी करीत गौरवोद्गार काढले. या आदिम वाद्यांच्या सप्त सुरांनी उपस्थित रसिक मंत्रमुग्ध झाले.
या वाद्यांच्या साहाय्याने आदिवासी जीवनशैलीचे सजीव दर्शन घडवले. मानवी क्रांतीचे नवीन परिणाम आदिवासी भागात दिसून येत आहेत.
आदिवासी बांधव नैसर्गिक सुविधा, पर्यावरण स्थितीचा आधार घेऊन कौशल्य प्राप्त करून आत्मनिर्भरते कडे वाटचाल सुरु आहे. पंचमहाभूते, पंच ज्ञानेंद्रिये या करीता राग निर्माण करण्याची ताकद विविध प्रकारच्या वाद्य मध्ये आहे. संगीत, नादब्रह्म
योग, अहिंसा हे नव्याने जगासमोर मांडणारा जगात एकमेव भारत आहे. सांस्कृतिक विभागाकडून कलात्मकतेचे दर्शन घडविले जाते आहे.
तालुक्यातील या वाद्यांचा समावेश होता. पावरी, ढाका, डेरा, थाळगाणार, तुर, घांगळी, घोळकाठी, नगारा, कहाळ्या, संबळ, तुणतुणे, ढोलकी, मादोळ, टापरा, मोहवर, बासरी, चंग.
या कलाकारांचा वाद्यरंगा समावेश. शिक्षक रतन चौधरी, वसंत सहारे, केशव टोपले, परशराम चौधरी, गुलाब म्हसे, शांताराम टोपले, रमेश पेटार, लाशा धुम, विठ्ठल धुम, धनशराम टोपले, नारायण चव्हाण, केशव टोपले, रामजी म्हसे, गणपत गावित, केशव भुसारे, माधव धुम, मोहन चौधरी, तुकाराम हाडस, मधुकर चव्हाण, डेरा वादक जानी हाडस, सुंदराबाई गांगुर्डे, कोशल्या गावित, कुसूम पवार, स्थानिक कलाकारांचा अभिमान, तालुक्यातील कलापथक, तरुण कलाकार, महिला कलाकार यांचा या कार्यक्रमात सहभाग उल्लेखनीय होता. त्यांचे कला सादरीकरण आणि तालबद्ध सर्जनशीलता यांना प्रेक्षकांनी मोठा प्रतिसाद दिला. पारंपरिक सांस्कृतिक वारसाचे केले जतन प्रतिक्रिया-"
सांस्कृतिक कार्य विभाग संचालनालय मुंबई यांच्या " वाद्यरंग" दुर्मिळ व पारंपरिक वाद्याचे प्रदर्शन या कार्यक्रमाच्या माध्यमातून दुर्मिळ होत असलेल्या लोकवाद्य व कला परंपरेला नवसंजीवनी मिळाली असून सरकारच्या अशा उपक्रमांमुळे स्थानिक संस्कृती आणि वारसा जपण्यास मोठा हातभार लागतो. त्यामुळे हा कार्यक्रम म्हणजे लोककला अभ्यासकांना एकाच मंचावर विविध प्रकारचे वाद्य पहाण्यासाठी दिलेली पर्वणीच होय. रतन चौधरी.
डांगी भाषा लोककला अभ्यासक सुरगाणा.
व्हिडिओ- मुंबई रविंद्र नाट्यगृह प्रभादेवी येथे वाद्यरंग प्रदर्शनात सहभागी सुरगाणा तालुक्यातील कलापथक. आदिम पारंपरिक वाद्य पहातांना सांस्कृतिक मंत्री डॉ. आशिष शेलार सह सांस्कृतिक कार्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.