*विकसित भारत 2047 सेवा पर्व पेंटिंग स्पर्धेत शीळच्या हर्षद गोंडाळ यांच्या चित्राला प्रथम क्रमांक*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*विकसित भारत 2047 सेवा पर्व पेंटिंग स्पर्धेत शीळच्या हर्षद गोंडाळ यांच्या चित्राला प्रथम क्रमांक*
*विकसित भारत 2047 सेवा पर्व पेंटिंग स्पर्धेत शीळच्या हर्षद गोंडाळ यांच्या चित्राला प्रथम क्रमांक*
मुंबई(प्रतिनिधी):-National Gallery of Modern Art, Mumbai (Ministry of Culture, Government of India) यांच्या वतीने आयोजित या राष्ट्रीय चित्रकला स्पर्धेत Brihanmumbai Municipal Corporation आणि Sir J. J. School of Art यांनी सहकार्य केले.
ही स्पर्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75 व्या जन्मदिनानिमित्त “Envision & Creatively Express Your Dream of Viksit Bharat” या विषयावर आयोजित करण्यात आली होती. मुंबईसह देशभरातील 200 पेक्षा अधिक कलाकारांनी सहभाग घेतला आणि कार्यक्रम 30 सप्टेंबर 2025 रोजी Gateway of India येथे पार पडला. या स्पर्धेत राजापूर तालुक्यातील शीळ गावचे सुपुत्र, चित्रकार हर्षद गोंडाळ यांच्या “विकसित भारत” विषयावरील चित्राला प्रथम क्रमांक मिळाला असून रोख 50000 धनादेश देऊन त्यांचा सन्मान केला आहे
सदर चित्रात हर्षद यांने आधुनिक, तंत्रज्ञाननिष्ठ आणि संस्कृतीने समृद्ध भारत दाखवला आहे जिथे तरुण, शेतकरी, वैज्ञानिक आणि कलाकार एकत्र येऊन प्रगतीचा नवा मार्ग तयार करत आहेत.
NGMA आणि Sir J. J. School of Art यांच्या परीक्षकांनी त्यांच्या कलाकृतीची कल्पकता, रंगसंगती आणि विषयावरची सखोलता यांचे विशेष कौतुक केले.
हा सन्मान माझ्या कलेसाठी मोठी प्रेरणा असल्याचे मत हर्षद गोंडाळ यांने प्रमोद तरळ यांच्याकडे व्यक्त केले आहे.