*नंदुरबार येथे वसुबारस निमित्त हिंदू जनजागृती समितीच्या वतीने गोमातेचे पूजन*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदुरबार येथे वसुबारस निमित्त हिंदू जनजागृती समितीच्या वतीने गोमातेचे पूजन*
*नंदुरबार येथे वसुबारस निमित्त हिंदू जनजागृती समितीच्या वतीने गोमातेचे पूजन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-वसुबारस या पावन दिवशी हिंदू संस्कृतीतील गौमातेचे पूजन करण्याचा सुंदर उपक्रम नंदुरबार येथे हिंदू जनजागृती समितीच्या वतीने संपन्न झाला. या कार्यक्रमात गौमातेचे विधिवत पूजन करून गोसेवेचे महत्त्व सांगण्यात आले. या प्रसंगी माजी उपनगराध्यक्ष ईश्वर चौधरी, माजी नगर सेवक प्रशांत चौधरी, ॲड. बाबा जयस्वाल, हिंदू सेवक केतन रघुवंशी, तसेच पंकज चौधरी, सुनील चौधरी, सुमित परदेशी, मयूर भाऊ चौधरी, विजय जोशी, कु. आश्लेषा पवार रणरागिनी शाखेच्या भावना कदम, सनातन संस्थेचे रवींद्र पवार, हिंदू जनजागृती समितीचे राहुल मराठे व सतीश बागुल आदी मान्यवर उपस्थित होते. या पूजन सोहळ्यास परिसरातील असंख्य गोभक्त बंधू व भगिनी मोठ्या उत्साहाने उपस्थित राहिले. पारंपरिक मंत्रोच्चारात वसुबारस साजरी करत, उपस्थितांनी गोसेवेचे व गौसंवर्धनाचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी गौमातेच्या रक्षणासाठी समाजात जनजागृती करण्याचा संकल्प केला.