*जिल्हा पोलीस दलातील अंमलदार सेवेतून बडतर्फ*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*जिल्हा पोलीस दलातील अंमलदार सेवेतून बडतर्फ*
*जिल्हा पोलीस दलातील अंमलदार सेवेतून बडतर्फ*
नंदूरबार(प्रतिनिधी):-16 सप्टेंबर 2025 रोजी नंदुरबार शहरातील उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या जय वळवी नामक व्यक्तीच्या खुनाच्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुर्यकांत सुधाकर मराठे ऊर्फ भैय्या बोबडया याच्या सोबत कपडे खरेदीसाठी गेलेला पोलीस शिपाई 489 चेतन निंबाजी चौधरी, नेमणूक- तळोदा पोलीस ठाणे यांच्यासह इतर आरोपींवर उपनगर पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 258/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 109, 352, 351 इ. अन्वये 17 सप्टेंबर 2025 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. नमुद गुन्हयातील मुख्य आरोपी सुर्यकांत मराठे याचा गुन्हेगारीचा पुर्व इतिहास माहिती असतांना देखील त्याच्यासोबत राहणे तसेच गुन्हा घडतेवेळी आरोपीस ताब्यात घेणे, नजिकच्या पोलीस ठाण्यात लागलीच घटनेबाबत कळविणे आवश्यक असतांनाही निलंबित पोशि/489 चेतन चौधरी यांनी आपल्या कर्तव्यात अत्यंत बेशिस्त, बेजबाबदार व निष्काळजीपणाचे तसेच हलगर्जिपणाचे वर्तन केले आहे. निलंबित पोलीस शिपाई चेतन चौधरी यांच्या अशा नैतिक अधःपतन दर्शविणाऱ्या वर्तनामुळे पोलीस दलाची प्रतिमा मलीन झाली. त्याअन्वये जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांनी पोशि/489 चेतन निंबाजी चौधरी यास भारतीय संविधान -1950 मधील अनुच्छेद 311 (2) (ब) मधील तरतुदीनुसार शासकीय सेवेतून बडतर्फ केले आहे.
पोलीस दलात शिस्त, प्रामाणिकपणा व पारदर्शकता यांना सर्वोच्च प्राधान्य देण्यात येते, सेवेत असतांना कोणत्याही अधिकारी व अंमलदाराने नियमबाह्य वर्तन केल्यास त्यांच्यावर कठोर शिस्तभंगविषयक कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांनी यावेळी दिला आहे.