*महेंद्र पब्लिक स्कूल, नंदुरबार तर्फे Students Volunteer Drive या उपक्रमाअंतर्गत “Joy of Giving” हा सामाजिक उपक्रम*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*महेंद्र पब्लिक स्कूल, नंदुरबार तर्फे Students Volunteer Drive या उपक्रमाअंतर्गत “Joy of Giving” हा सामाजिक उपक्रम*
*महेंद्र पब्लिक स्कूल, नंदुरबार तर्फे Students Volunteer Drive या उपक्रमाअंतर्गत “Joy of Giving” हा सामाजिक उपक्रम*
नंदूरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार येथील महेंद्र पब्लिक स्कूल, नंदुरबार तर्फे Students Volunteer Drive या उपक्रमाअंतर्गत “Joy of Giving” हा सामाजिक उपक्रम उत्साहात व आनंददायी वातावरणात पार पडला. या उपक्रमाचा प्रमुख उद्देश विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक उत्तरदायित्व, सहानुभूती आणि सेवेची भावना रुजविणे हा होता.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी स्वतःच्या इच्छेने ₹50 चे योगदान देऊन एकत्रित निधी जमा केला. या निधीतून आश्रमशाळेतील 50 विद्यार्थ्यांना पौष्टिक भोजन आणि दिवाळी भेटवस्तू किट देण्यात आले. या कृतीमुळे विद्यार्थ्यांमध्ये “देण्यातच खरा आनंद आहे” हा संदेश प्रभावीपणे पोहोचला. याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून दिनेश पाटील (निझर), सुनील पाटील (मुख्याध्यापक, यशवंत विद्यालय, नंदुरबार), शाळेच्या संचालिका श्रीमती पिनल शहा व प्राचार्य अरुण पाटील उपस्थित होते. अतिथींनी विद्यार्थ्यांच्या या सामाजिक उपक्रमाचे मनःपूर्वक कौतुक केले व विद्यार्थ्यांनी केलेल्या प्रयत्नांना शुभेच्छा दिल्या. त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासून सेवाभावाची जाणीव निर्माण झाली तर समाज अधिक संवेदनशील बनेल.”
शाळेचे संचालिका श्रीमती. पिनल शहा यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना सांगितले की, “विद्यार्थ्यांनी स्वतःहून समाजासाठी पुढे येणे ही खूप आनंदाची बाब आहे. अशा उपक्रमांमुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वात सामाजिक जबाबदारीची जाणीव वाढते.” कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षकवर्ग, विद्यार्थी मनःपूर्वक सहभाग घेतला.