*अली अल्लाना कॉलेज ऑफ फार्मसी, अक्कलकुवा येथे ‘ट्रायबल कम्युनिटी डेव्हलपमेंट’ कार्यक्रम*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*अली अल्लाना कॉलेज ऑफ फार्मसी, अक्कलकुवा येथे ‘ट्रायबल कम्युनिटी डेव्हलपमेंट’ कार्यक्रम*
*अली अल्लाना कॉलेज ऑफ फार्मसी, अक्कलकुवा येथे ‘ट्रायबल कम्युनिटी डेव्हलपमेंट’ कार्यक्रम*
अक्कलकुवा(प्रतिनिधी):-अली अल्लाना कॉलेज ऑफ फार्मसी, अक्कलकुवा येथे 16 सप्टेंबर 2025 रोजी ट्रायबल कम्युनिटी डेव्हलपमेंट कार्यक्रम पार पडला. हा कार्यक्रम कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ (KBC NMU) यांच्या सहकार्याने तसेच भारत सरकारच्या प्रधानमंत्री उच्चतर शिक्षण अभियान (PM-USHA) अंतर्गत आयोजित करण्यात आला होता. या योजनेचा उद्देश उच्च शिक्षण क्षेत्रात गुणवत्ता सुधार, संशोधन प्रोत्साहन आणि विद्यार्थ्यांना अधिक संधी उपलब्ध करून देणे हा आहे. कार्यक्रमाला 130 हून अधिक विद्यार्थी, शिक्षक व मान्यवर उपस्थित होते. उद्घाटन प्रसंगी डॉ. दिनेश खरात, सेनेट सदस्य KBC NMU यांनी आदिवासी संस्कृतीचे संवर्धन करण्याची गरज अधोरेखित केली व विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यातील मार्ग निश्चित करण्यासाठी प्रेरित केले. प्राचार्य डॉ. गुलाम जावेद खान यांनी स्वागतपर भाषणात जामियाच्या 35 वर्षांच्या कार्याचा आढावा घेतला आणि संस्थापक अध्यक्ष मौलाना गुलाम वस्तानवी साहेब यांच्या समाजासाठी शिक्षण, पिण्याचे पाणी, आरोग्यसेवा, रोजगार, उद्योजकता व सरकारी सेवा उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नांची माहिती दिली. अध्यक्ष मौलाना हुजैफा वस्तानवी यांनी मानवता आणि शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी तरुणांना मोबाईल व्यसनापासून सावध राहण्याचे सांगितले आणि विद्यार्थी हे समाजाचे स्तंभ असल्याचे नमूद केले. मुख्य व्याख्याते प्रो. एस. के. पवार, संचालक, ट्रायबल कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम (KBC NMU) यांनी आदिवासी क्षेत्रातील नामांकित व्यक्तिमत्त्वांच्या कार्याचा उल्लेख करून विद्यार्थ्यांना त्यांच्यापासून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले. एसो. प्रो. के. पी. दांगे यांनी आदिवासी स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानांची माहिती देऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले.
दुपारच्या सत्रात प्रो. एजाज अहमद, विभागप्रमुख फार्मा -केमिस्ट्री यांनी फार्मसी करिअर यावर मार्गदर्शन केले. तसेच जुबैर शेख, फार्मसी ऑफिसर, ग्रामीण रुग्णालय अक्कलकुवा यांनी सरकारी क्षेत्र व रुग्णालयांमधील संधींबाबत माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रो. मज्जाज काझी, विभागप्रमुख फार्माकोग्नोसी यांनी केले. जामियाच्या व्यवस्थापन, शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थ्यांच्या प्रयत्नामुळे हा कार्यक्रम यशस्वी पार पडला.