*स्वातंत्र्यसैनिक गुंडेराव अलट यांच्या स्मरणार्थ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*स्वातंत्र्यसैनिक गुंडेराव अलट यांच्या स्मरणार्थ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव*
*स्वातंत्र्यसैनिक गुंडेराव अलट यांच्या स्मरणार्थ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव*
लातूर(प्रतिनिधी):-मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त भगतसिंग विद्यालय आष्टा येथे स्वातंत्र्यसैनिक स्व. गुंडेराव माधवराव अलट यांच्या स्मरणार्थ गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मुख्याध्यापक अंकुश बिडवे यांनी भूषविले तर सरपंच सावता माळी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. स्व. गुंडेराव यांनी निजाम राजवटीत मराठवाड्याच्या मुक्तीसाठी सशस्त्र क्रांती उभारली. त्या काळात त्यांना दोन वर्षे बीदर येथील सेंट्रल जेलमध्ये कारावास भोगावा लागला. त्यांच्या सोबत देविदास जोशी (चाकूर) व आप्पाराव पाटील (कौळखेड) यांचाही सहभाग होता. देशसेवेसाठी आपले आयुष्य खर्ची घालणाऱ्या अलट यांच्या स्मरणार्थ विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी यासाठी दरवर्षी गावातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान केला जातो.
यावर्षी भगतसिंग विद्यालय आष्टा, जिल्हा परिषद केंद्रशाळा आष्टा व भंडारी प्राथमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
इयत्ता दहावीच्या शंतनु गायकवाड (प्रथम), गायत्री शेळके (द्वितीय), अमित निकम (तृतीय), ज्योत्स्ना निकम (चतुर्थ) यांचा विशेष गौरव करण्यात आला. तसेच मयुर शेळके याने कुस्ती स्पर्धेत तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविला. भंडारी प्राथमिक विद्यालयातील तेजश्री माळी, युवराज गायकवाड, रामेश्वर शेळके, गायत्री गायकवाड, अक्षरा निटुरे तसेच जिल्हा परिषद केंद्रशाळेतील स्वरा तात्पुरे, सम्यक कांबळे, सोहम चौधरी, गोवर्धन डांगे, चैतन्य शेळके, चेतन्य शेळके, अल्फिया शेख व प्रगती बिराजदार यांचा सन्मान करण्यात आला.
याशिवाय आष्टा गावातील तात्पुरे ज्योतीराम शेषेराव (मुंबई महापालिका सिव्हिल इंजिनिअर) व कांबळे अभिनंदन भानुदास (रेल्वे इंजिनिअर) यांच्या कुटुंबीयांचा विशेष गौरव करण्यात आला. सरपंच सावता माळी यांनी शालेय विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर मार्गदर्शन केले तसेच अलट परिवाराचा स्तुत्य उपक्रमाबद्दल गौरव केला. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिक्षक व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले. भुजंग पवार, तुकाराम अलट, पवन बिराजदार यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मारोती मुसने यांनी केले तर अध्यक्षीय भाषणातून मुख्याध्यापक अंकुश बिडवे यांनी समारोप केला.