*जी. टी. पाटील महाविद्यालयात "जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन" साजरा*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*जी. टी. पाटील महाविद्यालयात "जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन" साजरा*
*जी. टी. पाटील महाविद्यालयात "जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन" साजरा*
नंदुरबार(प्रतिनिधी):-येथील जी. टी. पाटील महाविद्यालय, नंदुरबार, प्राणीशास्त्र विभागाच्या वतीने "जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन" साजरा करण्यात आला. समाजातील वाढत्या तणावपूर्ण जीवनशैलीत आत्महत्या हा गंभीर सामाजिक व आरोग्य विषय ठरत असून, विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, सकारात्मकता व मानसिक आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणे या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य तथा क.ब. चौ.उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. महेंद्र रघुवंशी होते, तर प्रमुख वक्ता म्हणून नंदुरबार जिल्हा रुग्णालयातील मानसोपचार तज्ज्ञ श्रीयुत सुभाष डी पवार उपस्थित होते. प्रास्ताविकात प्राणीशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. गोविंद बळदे यांनी सांगितले की, आजच्या युगात मानसिक ताण, बेरोजगारी, सामाजिक स्पर्धा, कौटुंबिक समस्या व एकटेपणा ही आत्महत्येची प्रमुख कारणे ठरत आहेत. विद्यार्थ्यांनी अडचणींना सामोरे जाताना नकारात्मक विचाराऐवजी सकारात्मक दृष्टीकोन स्वीकारला पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले. प्रमुख अतिथी श्रीयुत सुभाष डी पवार यांनी "आत्महत्या हा उपाय नाही, तर संवाद, मदत व समुपदेशन हेच खरे उत्तर आहे" असे ठामपणे सांगितले. त्यांनी मानसिक तणाव हाताळण्यासाठी "शेअरिंग, काउन्सेलिंग व सपोर्ट सिस्टीम" यांचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच विद्यार्थ्यांनी सामाजिक माध्यमांवरील नकारात्मक प्रभावांपासून सावध राहण्याची गरज असल्याचे सांगितले. यावेळी आयोजित केलेल्या "मानसिक आरोग्य व आत्महत्या प्रतिबंध जागरूकता" या विशेष व्याख्यानात तज्ज्ञांनी विविध आकडेवारीसह वास्तव उदाहरणे मांडली. भारतात दरवर्षी हजारो तरुण आत्महत्या करत असल्याचे सांगून, तरुण पिढीला या संकटातून वाचविण्यासाठी कुटुंब, शाळा, महाविद्यालय व समाज यांची सामूहिक जबाबदारी असल्याचे प्रतिपादन करण्यात आले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी मानसिक आरोग्याविषयी प्रश्नोत्तरे केली. तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना तणाव व्यवस्थापनाच्या काही सोप्या पद्धती सांगितल्या, जसे की नियमित व्यायाम, ध्यान, वाचन, छंद जोपासणे आणि गरजेप्रमाणे समुपदेशन घेणे.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. महेंद्र रघुवंशी यांनी महाविद्यालयाने नेहमीच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपक्रम हाती घेतल्याचे नमूद केले. त्यांनी सांगितले की, “विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य हेच त्यांच्या शैक्षणिक प्रगतीचे व जीवनातील यशाचे खरे आधारस्तंभ आहे. आत्महत्या ही समस्या नाही तर ती एक टाळता येण्याजोगी दुर्दैवी घटना आहे.” कार्यक्रमाला संस्थेचे समन्वयक डॉ एम एस रघुवंशी, उपप्राचार्य डॉ संदीप पाटील, IQAC प्रमूख डॉ मनोहर पाटील आदी उपस्थित होते सदर कार्यक्रमात डॉ धनंजय पाटील यांनी यांनी सूत्रसंचालन केले, प्रा. जितेंद्र पाटील यांनी आभार प्रदर्शन केले. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. संदीप बडगुजर, प्रा. वैशाली मराठे, हर्षदा धुरकुंडे, विवेक वसावे तसेच प्रथम, द्वितीय व तृतीय वर्ष प्राणीशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये मानसिक आरोग्याविषयी जागरूकता वाढली असून, कठीण प्रसंगी सकारात्मकता, संवाद आणि मदत घेण्याची वृत्ती जोपासली गेली. प्राणीशास्त्र विभागाने घेतलेला हा पुढाकार प्रशंसनीय ठरला.