*ज. ग. नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयात ओझोन दिन उत्साहात संपन्न!*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*ज. ग. नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयात ओझोन दिन उत्साहात संपन्न!*
*ज. ग. नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयात ओझोन दिन उत्साहात संपन्न!*
नंदुरबार(प्रतिनिधी): -ज. ग. नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयात ओझोन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी प्राचार्या सौ. सुहासिनी नटावदकर यांनी भूषवले तर प्रमुख पाहुणे म्हणून कनिष्ठ महाविद्यालयाचे समन्वयक प्रा. एस. के. चौधरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून भूगोलाचे प्रा. चंद्रकांत प्रकाश देसले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना 16 सप्टेंबर 1987 रोजी झालेल्या मॉन्ट्रीयल प्रोटोकॉलचे महत्त्व स्पष्ट केले. त्यांनी ओझोन वायूचे सजीव सृष्टीसाठी असलेले संरक्षणात्मक कार्य, मानवी हस्तक्षेपामुळे होणारी जागतिक तापमानवाढ, त्यामुळे निर्माण झालेले ओझोन थराचे संकट आणि त्याच्या संवर्धनासाठी आवश्यक उपाययोजना याबाबत सविस्तर माहिती दिली. पुढील पिढ्यांचे सुरक्षित भविष्य हे ओझोन थराच्या संरक्षणावरच अवलंबून असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे प्रा. एस. के. चौधरी यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. तर प्रा. पी. जी. चौधरी यांनी ओझोन थराचे महत्त्व आणि लॉकडाऊनच्या काळात निसर्गात घडलेल्या सकारात्मक बदलांची माहिती उपस्थितांसमोर थोडक्यात मांडली. या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन भूगोल विभागातील विद्यार्थ्यांनी केले होते. यावेळी इयत्ता अकरावी व बारावीचे विद्यार्थी तसेच सर्व प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी केला.