*नवापूर येथे जागतिक ओझोन दिनानिमित्त बहुरंगी कार्यक्रमाचे आयोजन

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नवापूर येथे जागतिक ओझोन दिनानिमित्त बहुरंगी कार्यक्रमाचे आयोजन
*नवापूर येथे जागतिक ओझोन दिनानिमित्त बहुरंगी कार्यक्रमाचे आयोजन*
नंदूरबार(प्रतिनिधी):-पश्चिम खानदेश भिल्ल सेवा मंडळ नंदुरबार संचलित वनवासी प्राथमिक, माध्यमिक व एस. सी. चव्हाण ज्यू. कॉलेज चिंचपाडा ता. नवापूर येथे जागतिक ओझोन दिनानिमित्त बहुरंगी कार्यक्रमाचे आयोजन विज्ञान मंडळामार्फत करण्यात आले होते.
अध्यक्षस्थानी माध्य. विभागाचे मुख्याध्यापक प्रमोद चिंचोले व प्रमुख अतिथी म्हणून प्राथ. विभागाचे मुख्याध्यापक लक्ष्मण गावीत, ज्यू. विभाग प्रमुख रामकृष्ण सोनवणे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात माता सरस्वतीच्या प्रतिमा पूजनाने झाली. प्रास्ताविकेतून विज्ञान शिक्षक संदीप साळुंखे यांनी ओझोन दिन साजरा करण्यामागचा हेतू विद्यार्थ्यांना स्पष्ट करून सांगितला. ज्येष्ठ शिक्षिका श्रीम.कापडिया यांनी ओझोन दिनाविषयी आपले विचार व्यक्त केले.
प्रमुख वक्ता प्रा. दिलीप गावीत यांनी विविध प्रतिकृतींच्या माध्यमातून ओझोन वायूचे महत्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. शुभम परदेशी, निलेश भागवत यांनी UV किरणे व ओझोन यांचा परस्पर संबंध विद्यार्थ्यांना समजावून सांगितला.
प्रमुख अतिथी लक्ष्मण गावीत यांनी विद्यार्थ्यांना ओझोनचा थर वाचवण्यासाठी झाडांचे महत्त्व काय आहे याविषयी माहिती दिली.
पोस्टर प्रदर्शन संयोजन श्रीम. प्रतिमा पाडवी, श्रीम. दक्षायणी वसावे यांनी केले.
(सर्व विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट पोस्टर तयार केले. सर्वांचे मनस्वी अभिनंदन)
जागतिक ओझॉन दिवस पोस्टर प्रदर्शन स्पर्धा राबविण्यात आली. प्रथम उजय उमेश वळवी, द्वितीय कु. अनिका राहुल वसावे, तृतीय कु. हुमेरा साजिद तेली. आभार प्रदर्शन निलेश भागवत यांनी केले. सर्व शिक्षक वृंद यांनी संयोजन केले..