*साने गुरुजी मित्र मंडळ तर्फे, खान्देशरत्न सन्मान पुरस्कार 2025 शिक्षकांचा भव्य गौरव सोहळा संपन्न*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*साने गुरुजी मित्र मंडळ तर्फे, खान्देशरत्न सन्मान पुरस्कार 2025 शिक्षकांचा भव्य गौरव सोहळा संपन्न*
*साने गुरुजी मित्र मंडळ तर्फे, खान्देशरत्न सन्मान पुरस्कार 2025 शिक्षकांचा भव्य गौरव सोहळा संपन्न*
नंदुरबार(प्रतिनिधी):-शिक्षक हा केवळ ज्ञानदाता नसून समाजाचा दीपस्तंभ आहे. विद्यार्थ्यांच्या मनात संस्कारांची ज्योत पेटवून तोच समाजाचे भविष्य उज्ज्वल करतो. अशा थोर कार्यकर्त्यांचा गौरव करण्यासाठी साने गुरुजी मित्र मंडळ, शहादा यांच्या वतीने आयोजित “खान्देशरत्न सन्मान पुरस्कार 2025” सोहळा डोंगरगाव रोड येथील कुलकर्णी हॉस्पिटल कॉन्फरन्स हॉलमध्ये दिमाखात संपन्न झाला. शिक्षक पुरस्कार हा केवळ सन्मान नसून, तो प्रत्येक शिक्षकाच्या कार्याचा गौरव आहे. शिक्षक समाजाच्या घडणीत आणि मुलांच्या संस्कारात अत्यंत महत्वाची भूमिका बजावतात. शिक्षक पुरस्कारामुळे समाजात चांगले काम करणाऱ्या शिक्षकांना प्रोत्साहन मिळते, तर इतर शिक्षकांनाही प्रेरणा मिळते. हे पुरस्कार शिक्षकांच्या निःस्वार्थ परिश्रमांची दखल घेणारे आणि समाजात त्यांच्या योगदानाचे महत्त्व अधोरेखित करणारे आहेत. साने गुरुजी मित्र मंडळाच्यावतीने आम्ही नेहमीच अशा शिक्षकांचा सन्मान करीत राहू ज्यांनी शिक्षण क्षेत्रात आदर्श निर्माण केला आहे." या पुरस्कारासाठी शहादा तालुक्यातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 16 गुणवंत शिक्षकांची निवड करण्यात आली. यामध्ये शांतीलाल रामचंद्र अहिरे (मुख्याध्यापक, तर्हाडी), सुनिल भिका पवार (शेल्टि), दिनेश नारायण चव्हाण (उखळशेम), प्रकाश चंद्रकांत मोरे (लंगडी भवानी), मोसमी सुभाषचंद्र जैन (पुसनद), नाना हिरामण कोळी (टेंभली), इरेशा रामचंद्र आजुरे (म्हसावद), दिलीप बान्या पवार (वाडी), राकेश धनराज अहिरे (मुबारकपूर), तुषार पांडुरंग माळी (कोंढावळ), मनिषा भुपेंद पटेल (दामळदा), पद्मा कैलास पाटिल (वडिल), चतुर राजाराम पाटिल (पाडळदा), चतुर्भुज विनायक शिंदे (लंगडी भवानी), प्रविण बन्सीलाल पाटिल (सुलतानपूर) व नरेंद्र दगा कुवर (धुरखेडा) यांचा समावेश आहे. या कार्यक्रमांचे अध्यक्ष गांधी विचारवंत डॉ विश्वास पाटील तर प्रमुख पाहुणे डॉ शशांक कुलकर्णीऍड गोविंद पाटील, जायंन्टस ग्रुपचे सेंट्रल कमिटी मेंबर रविंद्र जमादार, साहित्यिक डॉ अल्का कुलकर्णी, डॉ लकेशकुमार पाटील, साने गुरुजी मित्र मंडळाचे अध्यक्ष माणक चौधरी, साचिव गुलाबराव पवार, उपाध्यक्ष डॉ विवेक पाटील आदी उपस्थित होते. या मान्यवरांच्या शुभ हस्ते सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ व मानपत्र देऊन या सर्व शिक्षकांचा बहुमान करण्यात आला. या वेळी शिक्षकांच्या जीवनकार्याची थोडक्यात ओळख करून देताना उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात भरभरून दाद दिली. काही शिक्षकांनी आपल्या मनोगतातून “शिक्षण हीच खरी सेवा” असल्याची जाणीव करून दिली. त्यांच्या कार्यामुळे शाळा, विद्यार्थी आणि संपूर्ण समाज उजळून निघाल्याचे भावनिक वातावरण सभागृहात निर्माण झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक साने गुरुजी मित्र मंडळ शहादाचे अध्यक्ष माणक चौधरी यांनी केले. सुत्रसंचालन तुकाराम अलट यांनी केले. आभार प्रदर्शन साने गुरुजी मित्र मंडळाचे सचिव गुलाबराव पवार यांनी मानले. या सोहळ्यासाठी साने गुरुजी मित्र मंडळाचे अध्यक्ष माणक चौधरी, उपाध्यक्ष गुलाबराव पवार तसेच सर्व पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले. नागरिक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सन्मान सोहळ्यास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शिक्षकांमधुन मनोगत चतुर पाटिल, चुतुर्भुज शिंदे, दिनेश चव्हाण यांनी शैक्षणिक क्षेत्रातील चांगले अनुभव विशद केले.
कार्यक्रमाच्या शेवटी आयोजक तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष जेष्ठ साहित्यिक विश्वास पाटिल यांनी प्रेरणादायी मार्गदर्शन केले. मंडळाने व्यक्त केले की, “या पुरस्कार सोहळ्यामुळे शिक्षकांविषयी समाजात आदरभाव वाढेल व पुढील पिढ्यांना त्यांचे महत्त्व अधिक दृढतेने जाणवेल.” अशा प्रकारे या सोहळ्याने केवळ शिक्षकांचा सन्मान झाला नाही तर समाजात शिक्षणाची व संस्कारांची मशाल अधिक तेजस्वीपणे पेटली.