माझा बाप्पा रील स्पर्धा 2025' या स्पर्धेत संगमेश्वर मधील देवडे रामवाडीतील विजय तळेकर यांचा देखावा प्रथम*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
माझा बाप्पा रील स्पर्धा 2025' या स्पर्धेत संगमेश्वर मधील देवडे रामवाडीतील विजय तळेकर यांचा देखावा प्रथम*
*'माझा बाप्पा रील स्पर्धा 2025' या स्पर्धेत संगमेश्वर मधील देवडे रामवाडीतील विजय तळेकर यांचा देखावा प्रथम*
संगमेश्वर(प्रतिनिधी):-तालुक्यामधील मौजे देवडे रामवाडीतील विजय तळेकर आणि 'तळेकर कुटुंबीय' यांच्या घरातील गणपती बाप्पा मखर सजावट आणि बाप्पाची सुबक अशी मनमोहक मूर्तीचा ऑफबीट आर्टिस्ट आणि अथर्व साळवी मित्र परिवार आयोजित माझा बाप्पा रील स्पर्धा-2025 या स्पर्धेत राजापूर- लांजा- साखरपा विधानसभा मतदार संघात पहिला नंबर पटकावला आहे. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ 13.9. 2025 रोजी शासकीय विश्रामगृह रत्नागिरी येथे रत्नागिरी जिल्याचे पालकमंत्री मान. उदय सामंत माजी आमदार राजन साळवी व इतर मान्यवर पदाधिकारी यांच्या उपस्थितीत पार पडला. यावर्षी बाप्पाच्या मूर्तीला साजेशी अशी सजावट करण्यात आली होती. श्रीकृष्णाच्या रूपातील बाप्पाची द्वारकानगरी समुद्रात बुडाली याची प्रतिकृती साकारण्याचा छोटासा प्रयत्न सजावटीच्या माध्यमातून करण्यात आला. बाप्पाच्या या मखर सजावटीसाठी अमृत तळेकर, सार्थक तळेकर, अक्षय तळेकर, शुभम तळेकर, सौ.तेजल तळेकर आणि घरातील इतर सर्व मुलांनी अहोरात्र मेहनत घेऊन ही मखर सजावट सुशोभित केली आहे. घरातील सर्व थोर व्यक्तीचे विशेष सहकार्य लाभले.