*डी. आर. हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी घेतला 3 D चित्रपटाचा आनंद*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*डी. आर. हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी घेतला 3 D चित्रपटाचा आनंद*
*डी. आर. हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी घेतला 3 D चित्रपटाचा आनंद*
नंदुरबार(प्रतिनिधी):-पहूरकर सायन्स सेंटर व डी आर हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेच्या विद्यार्थ्यांना 3 D चित्रपट दाखवण्यात आले. यामध्ये ॲनिमेशन व्हिडिओ, सौर मंडळ, डायनासोर पार्क, कार्टून शो, दक्षिण आफ्रिकेतील जंगल, बेस्ट फन शो, समुद्र सफारी अशा विविध प्रकारच्या लहान क्लिपा विद्यार्थ्यांना दाखवण्यात आले. या उपक्रमाचा लाभ जवळपास 500 विद्यार्थ्यांनी घेतला. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक मोहन अहिरराव, उपमुख्याध्यापक श्रीराम मोडक, पर्यवेक्षक संजय सैंदाणे, हेमंत खैरनार, विज्ञान विभाग प्रमुख दिनेश वाडेकर तसेच सर्व शिक्षक शिक्षिका उपस्थित होते.