*म्हसावद येथे अवैध दारू बाळगणा-या इसमावर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई,एकूण 3 लाख 28 हजार 440 रुपये किमतीचा दारुचा मुद्देमाल जप्त*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*म्हसावद येथे अवैध दारू बाळगणा-या इसमावर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई,एकूण 3 लाख 28 हजार 440 रुपये किमतीचा दारुचा मुद्देमाल जप्त*
*म्हसावद येथे अवैध दारू बाळगणा-या इसमावर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई,एकूण 3 लाख 28 हजार 440 रुपये किमतीचा दारुचा मुद्देमाल जप्त*
नंदूरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना 14 सप्टेंबर 2025 रोजी गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, म्हसावद पोलीस ठाणे हद्दीतील नागझिरी गावाच्या शिवारात शिवा भिल रा. नामबारपाडा पो. राणीपुर ता. शहादा याचे शेताच्या बांधावरील झोपडीच्या आडोश्याला रतिलाल ऊर्फ रडत्या भिल याने विनापरवाना बिअर व विदेशी दारु चोरटी विक्री करण्याचे उद्देशाने ठेवली आहे. बाबत खात्रीशिर माहिती मिळाली. सदर माहितीचे आधारे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त, एस यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी पथकास बातमीची खात्री करुन कारवाई करणेकामी सांगितले. मिळालेल्या बातमीचे अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा पथक यांनी म्हसावद पोलीस ठाणे यांच्या मदतीने नमुद बातमीचे ठिकाणी जाऊन खात्री केली असता, नागझिरी गावात शिवा भिल यांचे शेताजवळील एका झोपडीच्या आडोशाला एक इसम उभा असल्याचे दिसले. त्याचे जवळच काही खोक्यांचा साठा दिसुन आला. त्यावेळी सदर इसमाचे जवळ पथक जात असतांना त्यास पोलीस असल्याचा संशय आल्याने त्याने तेथून पळ काढला, पळत असतांना त्याने मागे पाहिले असता तो रेकॉर्डवरील आरोपी रतिलाल ऊर्फ रडत्या आलम भिल, रा. नागझिरी, ता. शहादा हा असल्याचे समजले. सदर ठिकाणी पोलीसांनी पाहणी करता तेथे बिअर व विदेशी दारुचा एकुण 3 लक्ष 28 हजार 440 रुपये रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात स्थानिक गुन्हे शाखेचे पथकास यश मिळाले आहे. त्याअन्वये इसम नामे रतिलाल ऊर्फ रडत्या आलम भिल, रा.नागझिरी, ता. शहादा जि. नंदुरबार याचे विरुध्द म्हसावद पोलीस ठाणे येथे महा. दारुबंदी कायदा कलम 65 (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोउपनि- मुकेश पवार, पोहेको/जितेंद्र पाडवी, पुरुषोत्तम सोनार, पोना/विकास कापूरे पोकों /अभिमन्यु गावीत, भरत उगले यांनी केली आहे.