*रघुवंशी नर्सिंग कॉलेजमध्ये शिक्षक–पालक मेळावा संपन्न*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*रघुवंशी नर्सिंग कॉलेजमध्ये शिक्षक–पालक मेळावा संपन्न*
*रघुवंशी नर्सिंग कॉलेजमध्ये शिक्षक–पालक मेळावा संपन्न*
नंदुरबार(प्रतिनिधी):-रघुवंशी नर्सिंग कॉलेज, नंदुरबार येथे सोमवार दिनांक 15 सप्टेंबर रोजी शिक्षक–पालक मेळावा आयोजित करण्यात आला. हा कार्यक्रम नंदुरबार तालुका विधायक समितीचे चेअरमन आमदार चंद्रकांत रघुवंशी, ह्वाईस चेअरमन मनोज रघुवंशी तसेच नताविस. संचालक मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. नंदुरबार तालुका विधायक समितीचे समन्वयक एम. एस. रघुवंशी हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. प्रा. भूषण ठोंबरेरे आणि प्रा. योगिनी सपकळे इ. व्यासपीठावर उपस्थित होते.
पालकांना रघुवंशी नर्सिंग महाविद्यालयात ऊपलब्ध सुविधा समजावून सांगण्यात आल्या, ज्यामध्ये क्लिनिकल ट्रेनिंगसाठी छत्रपती मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व कौशल्य विकासासाठी सुसज्ज नर्सिंग प्रयोगशाळा, प्रशस्त क्लासरूम व सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी मल्टीपर्पज हॉल याबद्दल उपस्थित विद्यार्थी व पालकांना माहिती देण्यात आली.
प्रा. ठोंबरे यांनी पालक व विद्यार्थ्यांना नर्सिंग क्षेत्रातील नव्याने उपलब्ध झालेल्या सेमिस्टर अभ्यासक्रम व महाविद्यालयीन नियमावली याबद्दल माहिती दिली, तर प्राध्यापीका योगिनी सपकळे यांनी नर्सिंग व्यवसायातील उपलब्ध असलेल्या विविध क्षेत्रातील संधींबद्दल मार्गदर्शन केले. ग्रंथपाल प़ंमेश वसावे यांनी उपलब्ध असलेल्या ग्रंथालयातील सुविधा, संशोधन सुविधा, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संशोधन जर्नल याबद्दल उपस्थित पालकांना अवगत केले. नर्सिंग अभ्यासक्रमामध्ये असलेल्या इतर शैक्षणिक भेटी याबद्दल महाविद्यालयातील शिक्षक भूषण वळवी यांनी प्रकाश टाकला. मुलींच्या वस्तीगृहाबद्दल शिक्षिका सोनल वळवी यांनी सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंजली तडवी यांनी केले व आभार प्रदर्शन मधुर वळवी यांनी केले. शिक्षक शंकर वसावे, वंदना वळवी या शिक्षकांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मेहनत घेतली तसेच शिक्षक इतर कर्मचारी अशोक धोबी, आकाश शिंदे व विवेक मराठे यांनी विशेष सहकार्य केले.