*देवरे विद्यालयात हिंदी दिवसानिमित्त विविध कार्यक्रमाची सांगता*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*देवरे विद्यालयात हिंदी दिवसानिमित्त विविध कार्यक्रमाची सांगता*
*देवरे विद्यालयात हिंदी दिवसानिमित्त विविध कार्यक्रमाची सांगता*
नंदुरबार(प्रतिनिधी):-तालुक्यातील आत्माराम धवळू देवरे माध्यमिक विद्यालय विखरण विद्यालयात हिंदी दिनानिमित्ताने विद्यार्थ्यांनी विविध कार्यक्रमांद्वारे हिंदी दिनाचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमाचे उद्घाटन विद्यालयाचे मुख्याध्यापक डी.डी. साळुंके व हिंदी विषय प्रमुख उपशिक्षिका ए.एस. बेडसे यांच्या हस्ते भारत मातेचे पूजन करून करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपशिक्षक डी.बी. भारती यांनी केले. विद्यार्थ्यांनी हिंदी भाषेचे महत्त्व आपल्या भाषणातून विशद केले. त्यातून प्रथम क्रमांक भावेश पानपाटील, द्वितीय रुपेश पाटील, व तृतीय जितेंद्र पाटील यांनी पटकावला. कु. मानसी पाटीलने हिंदी पहेलिया मनोरंजकरित्या सादर केल्या. चि. दिपेश लोहार व कु. देवर्षी पाटील यांनी कराओके ट्रॅकवर देशभक्तीपर गीते सादर केली. चि. कृष्णा पाटील व इयत्ता नववी दहावीच्या विद्यार्थ्यांनी मिळून हिंदी भाषेचे महत्व पथनाट्याद्वारे सादर केले. अनेक विद्यार्थ्यांनी कथा, कविता, कहावते सादर केलेत. तत्पूर्वी हिंदी विषयाच्या विभाग प्रमुख ए. एस.बेडसे यांनी हिंदी दिनाचे महत्त्व व पार्श्वभूमी आपल्या व्याख्यानातून मांडली. अध्यक्षीय भाषणातून मुख्याध्यापक डी.डी. साळुंके यांनी हिंदी दिनाविषयी मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध कार्यक्रमांचे कौतुक करत, हिंदी भाषेचे महत्व, हिंदी विषयातील विविध कथा, कविता, साहित्य वाचण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देवर्षी पाटील, सुवर्णा पाटील, मानसी पाटील यांनी तर आभार शिवानी पाटील यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी उपशिक्षक सी.व्ही. नांद्रे एम.डी.नेरकर, वाय.डी.बागुल,एम.एस.मराठे, एस.एच. गायकवाड,व्ही.बी.अहिरे तसेच डी.बी. पाटील एस.जी. पाटील एच.एम. खैरनार आदींनी संयोजन केले.