*सोनाली पावरा हिच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या आश्रमशाळेतील मुख्याध्यापक,अधिक्षक व कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करा-बिरसा फायटर्स*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*सोनाली पावरा हिच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या आश्रमशाळेतील मुख्याध्यापक,अधिक्षक व कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करा-बिरसा फायटर्स*
*सोनाली पावरा हिच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या आश्रमशाळेतील मुख्याध्यापक,अधिक्षक व कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करा-बिरसा फायटर्स*
नंदूरबार(प्रतिनिधी):-केंद्रीय निवासी आश्रमशाळा गणेशपूर तालुका साक्री जिल्हा धुळे येथील आदिवासी विद्यार्थीनी कुमारी सोनाली सुनील पावरा वय 12 हिच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या शाळेचे मुख्याध्यापक, अधिक्षक व संबंधित कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करून सेवेतून निलंबित करा, अशी मागणी बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून आदिवासी विकास मंत्री अशोक ऊईके यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदन देताना बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा, राज्याध्यक्ष गोपाल भंडारी, आकाश तडवी आदि कार्यकर्ते उपस्थित होते. केंद्रीय निवासी आश्रमशाळा गणेशपूर ता.साक्री जि.धुळे येथील आदिवासी विद्यार्थीनी कुमारी सोनाली सुनील पावरा वय 12, मूळ गाव खरवड ता. धडगांव जि.नंदुरबार हिचा शाळेतील कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणा व वेळीच वैद्यकीय उपचार न केल्या कारणास्तव दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सोनाली पावरा ही विद्यार्थीनी शाळेत आजारी आहे, हे शाळा प्रशासनाने पालकास कळविले नाही. आजारी असताना तातडीने दवाखान्यात दाखल केले नाही. तिची प्रकृती जास्तच खालावत असल्याचे लक्षात आल्यानंतर सरकारी रूग्णालयात दाखल केले. यात शाळा प्रशासनाने विद्यार्थींवर वैद्यकीय उपचार करण्यासाठी हलगर्जीपणा केलेला आहे. या शाळेतील विद्यार्थांना सर्दी, ताप, खोकला इत्यादी आजाराने त्रस्त केले होते. परंतू शाळा प्रशासनाने त्यांच्यावर वेळीच उपचार सुरू केले नाहीत. कुमारी सोनाली सुनील पावरा हिला साक्री येथील सरकारी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केल्यानंतर साक्री येथे मरण पावली. मृत् अवस्थेत तिला धुळे येथील सरकारी रूग्णालयात नेण्यात आले व तिथे तिला दिनांक 9 सप्टेंबर 2025 रोजी रात्री मृत् घोषित करण्यात आले आहे, असा आरोप मुलीचे पालक करीत आहेत. म्हणून केंद्रीय निवासी आश्रमशाळा गणेशपूर ता. साक्री जि. धुळे येथील कुमारी सोनाली सुनील पावरा हिच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या शाळा मुख्याध्यापक, अधिक्षक व संबंधित कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करून सेवेतून निलंबित करण्यात यावे, अन्यथा बिरसा फायटर्स संघटनेकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून आदिवासी विकास मंत्र्यांकडे करण्यात आली आहे.