*कृषि विज्ञान केंद्र, नंदुरबार येथे नवसंशोधक शेतकरी परिषद :24कृषि नवकल्पना सादर*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*कृषि विज्ञान केंद्र, नंदुरबार येथे नवसंशोधक शेतकरी परिषद :24कृषि नवकल्पना सादर*
*कृषि विज्ञान केंद्र, नंदुरबार येथे नवसंशोधक शेतकरी परिषद :24कृषि नवकल्पना सादर*
नंदूरबार(प्रतिनिधी):-भारतरत्न अभियंता एम. विश्वेश्वरैया यांच्या जयंतीनिमित्त कृषि विज्ञान केंद्र, नंदुरबार येथे भव्य नवसंशोधक शेतकरी परिषदचे आयोजन करण्यात आले. या परिषदेमध्ये जिल्ह्यातील 40 नवसंशोधक शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवून आपल्या स्वतःचा शोध व तंत्रज्ञानाच्या कल्पना सादर केल्या. एकूण नंदुरबारच्या सहाही तालुक्यातून 24 अनोख्या नवकल्पना शेतकऱ्यांनी प्रदर्शनाद्वारे मांडून उपस्थितांना त्याचे प्रत्यक्ष स्पष्टीकरण दिले. या कार्यक्रमाला सुरेश पाटील संचालक डॉ. हेडगेवार सेवा समिती नंदुरबार यांनी अध्यक्ष म्हणून उपस्थित राहून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी नवकल्पक विचारांमुळे शेतीत उत्पादनवाढ व ग्रामीण विकास साधता येतो, असे सांगितले. विशेष अतिथी डॉ. भूषण चौधरी, संचालक, जैवशास्त्र प्रशाळा, क.ब.चौ.उ.म.वि. जळगाव यांनी भारतातील हरितक्रांतीचे योगदान, पेटंट नोंदणीची प्रक्रिया, बौद्धिक संपदा हक्कांचे महत्त्व याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच स्टार्टअप उभारणीची संधी व त्याचे फायदे यावरही त्यांनी शेतकऱ्यांना प्रेरणा दिली. नितीन देवरे यांनी बेबी बर्थ आणि दिव्यांगस्नेही रॅम्प या स्वतःच्या शोधांना मिळालेल्या पेटेंट मिळण्याच्या प्रक्रियेबाबत अनुभव कथन केले. त्यांनी आपल्या इतर नवकल्पनांची माहिती दिली. मौलिक कल्पना पेटंटद्वारे जतन करण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
मेळाव्याला इतर मान्यवरही दीपक पटेल प्रकल्प संचालक आत्मा नंदुरबार, यशपाल पटेल संचालक डॉ. हेडगेवार सेवा समिती नंदुरबार,
डॉ. एच. एम. पाटील प्राचार्य बामखेडा महाविद्यालय,
आशिष वाणी व मिलिंद वडनगरे विज्ञान अभ्यासक नंदुरबार, राजेंद्र दहातोंडे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख कृषि विज्ञान केंद्र नंदुरबार उपस्थित होते. दीपक पटेल प्रकल्प संचालक आत्मा नंदुरबार यांनी आपलेल्या आलेल्या समस्येवर उपाययोजना शोधण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न प्रसंशनीय असल्याचे सांगितले. मिलिंद वडनगरे विज्ञान अभ्यासक नंदुरबार यांनी पिको उपग्रहाची माहिती देत हवामान अंदाज व अभ्यास करण्यासाठी उपयुक्तता सांगत नवसंशोधकांना शुभेच्छा दिल्या.
डॉ. एच. एम. पाटील यांनी या उपक्रमाचे कौतुक करीत नवसंशोधक शेतकऱ्यांनी आपली नवकल्पना शक्ती जपण्याचे आवाहन केले. मान्यवरांनी नंदुरबार जिल्ह्याच्या जैवविविधतेचे महत्त्व अधोरेखित करून शेतकऱ्यांच्या कल्पकतेचे कौतुक केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जयंत उत्तरवार, विषय विशेषज्ञ, कृषि अभियांत्रिकी यांनी केले तर डॉ. वैभव गुर्वे, विषय विशेषज्ञ, उद्यानविद्या यांनी आभारप्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली. नवसंशोधक शेतकरी परिषद जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आपले शोध व्यापक स्तरावर नेण्याची प्रेरणा देणारा ठरला असून, पेटंट व स्टार्टअपच्या माध्यमातून शेतीतील नवकल्पना देशभर पोहोचविण्याचा संकल्प या ठिकाणी दृढ झाला.