*तिरुपती (आंध्र प्रदेश) येथे संसदीय आणि कायदेविषयक समित्यांची पहिली राष्ट्रीय परिषद; माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांची प्रमुख उपस्थिती*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*तिरुपती (आंध्र प्रदेश) येथे संसदीय आणि कायदेविषयक समित्यांची पहिली राष्ट्रीय परिषद; माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांची प्रमुख उपस्थिती*
*तिरुपती (आंध्र प्रदेश) येथे संसदीय आणि कायदेविषयक समित्यांची पहिली राष्ट्रीय परिषद; माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांची प्रमुख उपस्थिती*
नंदुरबार(प्रतिनिधी):-तिरुपती (आंध्र प्रदेश) येथे संसदीय आणि कायदेविषयक समित्यांची पहिली राष्ट्रीय परिषद पार पडत असून महिला सक्षमीकरण राष्ट्रीय समितीच्या माजी अध्यक्षा म्हणून निमंत्रित केल्यावरून माजी खासदार डॉक्टर हिना गावित या राष्ट्रीय परिषदेस आवर्जून उपस्थित राहिल्या. लोकसभा व संघराज्य क्षेत्रातील महिला सक्षमीकरणावरील संसदीय आणि कायदेविषयक समित्यांची पहिली राष्ट्रीय परिषद दिनांक 14 व 15 सप्टेंबर 2025 रोजी तिरुपती, आंध्रप्रदेश येथे संपन्न होत आहे. या राष्ट्रीय परिषदेस महिला सक्षमीकरण समितीच्या माजी अध्यक्षा म्हणून माजी खासदार डॉक्टर हिना गावित आवर्जून निमंत्रित करण्यात आले होते म्हणून त्यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून चर्चेत सहभाग घेतला. राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या शुभहस्ते झाले. याप्रसंगी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याशी डॉक्टर हिना गावित यांनी या परिषदेसाठी महिलांचे सक्षमीकरण व महिला सबलीकरण या विषयावर चर्चा केली. त्याचबरोबर महाराष्ट्राच्या खासदार सौ. सुनेत्रा अजित पवार, खासदार स्मिता वाघ, गुजरात मधील जामनगरच्या आमदार रिवाबा रविंद्र जडेजा यांच्या समवेत संवाद साधला. समितीच्या सदस्या आमदार सीमा हिरे, आमदार सरोज अहिरे, आमदार संजना जाधव, आमदार प्रज्ञा सातव तसेच महाराष्ट्र विधिमंडळाच्या सचिव मेघना तळेकर व अप्पर सचिव प्राजक्ता कुलकर्णी उपस्थित होत्या.