*मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत जनजागृती रथास हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत जनजागृती रथास हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ*
*मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत जनजागृती रथास हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ*
नंदूरबार(प्रतिनिधी):-जिल्हा परिषद नंदुरबार व पंचायत समिती नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक 15 सप्टेंबर 2025 रोजी जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी, मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत उदय कुसूरकर, नंदुरबार जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व जिल्हा परिषद व पंचायत समितीचे विविध विभागाचे खाते प्रमुख यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान बाबत जनजागृती करण्यासाठी जनजागृती रथास हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला. सदर जनजागृती रथ हा तालुक्यातील ग्रामपंचायत स्तरावर गावोगावी जाऊन दिनांक 17 सप्टेंबर ते दिनांक 31 डिसेंबर या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान कार्यक्रमात सुशासन युक्त पंचायत, सक्षम पंचायत, जलसमृद्ध स्वच्छ व हरित गाव, मनरेगा व इतर योजनांशी अभिसरण, गाव पातळीवरील संस्था सक्षमीकरण, उपजीविका विकास, सामाजिक न्याय, लोकसहभाग व श्रमदान माध्यमातून लोक चळवळ निर्माण करणे
तसेच इतर नाविन्यपूर्ण उपक्रमासोबत या 100 दिवसाच्या अभियान कालावधीत करावयाच्या कामाबाबत ग्रामस्थांमध्ये जनजागृती करण्यासाठी व ग्रामस्थांचा सदर अभियानात जास्तीत जास्त सहभाग घेऊन गावाचा खऱ्या अर्थाने विकास करण्याच्या दृष्टीने तसेच गाव पुढे नेण्यासाठी प्रचार व प्रसिद्धी करण्यात येणार आहे.