*जि. प. पू. प्रा.गोखले कन्याशाळा राजापूरचे विद्यार्थीप्रिय शिक्षक सुहास काडगे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*जि. प. पू. प्रा.गोखले कन्याशाळा राजापूरचे विद्यार्थीप्रिय शिक्षक सुहास काडगे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर*
*जि. प. पू. प्रा.गोखले कन्याशाळा राजापूरचे विद्यार्थीप्रिय शिक्षक सुहास काडगे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर*
राजापूर(प्रतिनिधी):-जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक गोखले कन्याशाळेचे विद्यार्थीप्रिय शिक्षक सुहास प्रेमलता यशवंत काडगे यांना जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने देण्यात येणाऱ्या आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
काडगे हे गोखले कन्याशाळेत 2023 पासून अध्यापनाचे काम करत आहेत. यापूर्वी ते जि.प. प्रा. अस्तान नं 1 ता. खेड, जि.प. आदर्श शाळा चुनाकोळवण निवखोल,जि.प.शाळा शेढे नं 1, जि प. शाळा कणेरी ता. राजापूर या शाळांमध्ये आपली सेवा बजावली आहे. त्यांना आजवर अ. आ. देसाई गुरुवर्य पुरस्कार, जाहीर शिक्षक रत्न पुरस्कार, शिक्षक पुरस्कार, राष्ट्रीय समता फेलोशिप पुरस्कार राजापूर तालुका प्रेस क्लबचा आदर्श शिक्षक पुरस्कार आदी अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्याशिवाय नवोपक्रम स्पर्धा, मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा या अभियानात राजापूर तालुक्यातून प्रथम क्रमांक, सर्वांगीण शैक्षणिक गुणवत्ता कार्यक्रम सन 2009- 10 मध्ये शाळेला जिल्ह्यात प्रथम क्रमांक तर 2008- 9 मध्ये तालुक्यात तृतीय क्रमांक मिळवून दिला राजापूर तालुका शिष्यवृत्ती परिक्षा प्रश्नसंच निर्मितीसाठी तसेच राजापूर शिष्यवृत्ती अभियानांतर्गत प्रश्नपत्रिका निर्मितीत सहभाग काडगे हे अष्टपैलू शिक्षक असून अध्यापन व्यतिरीक्त विद्यार्थ्यांना शाळाबाह्य शिक्षण मिळावे शाळेतून बाहेर पडल्यावर तो एक चांगला माणूस घडावा यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहिले आहेत. काडगे यांना जि.प चा जि.प. पू. प्रा. गोखले कन्याशाळेतील शिक्षक सुहास काडगे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल आदर्श केंद्र शाळा जवळेथरचे संदीप बाळकृष्ण परटवलकर यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे तसेच राजापूर तालुक्यातील शिक्षण क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.