*ट्रेलिस पद्धतीने भाजीपाला शेतीत क्रांती–केव्हीके नंदुरबारमध्ये शेतकरी प्रशिक्षण संपन्न*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*ट्रेलिस पद्धतीने भाजीपाला शेतीत क्रांती–केव्हीके नंदुरबारमध्ये शेतकरी प्रशिक्षण संपन्न*
*ट्रेलिस पद्धतीने भाजीपाला शेतीत क्रांती–केव्हीके नंदुरबारमध्ये शेतकरी प्रशिक्षण संपन्न*
नंदूरबार(प्रतिनिधी):-आत्मा नंदुरबार व इंडियन ग्रामीण सर्व्हिसेस, नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच कृषी विज्ञान केंद्र, नंदुरबार यांच्या सहकार्याने 12 व 13 सप्टेंबर 2025 रोजी दोन दिवसीय मंडप शेती व भाजीपाला लागवड तंत्रज्ञान प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. या प्रशिक्षणात जिल्ह्यातील एकूण 30 शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला.
या कार्यक्रमाचा उद्देश शेतकऱ्यांना ट्रेलिस पद्धतीवरील भाजीपाला लागवड, नर्सरी व्यवस्थापन व शास्त्रीय पद्धतीने अन्नद्रव्य व्यवस्थापन याबाबत सखोल माहिती देणे हा होता. काकडी, कारली, दोडका, तोंडली, करटुली व दुधी भोपळा या पिकांच्या लागवडीसंदर्भात मातीची तयारी, पेरणी पद्धती, लागवड अंतर व मंडप उभारणीचे डिझाईन यावर सविस्तर माहिती देण्यात आली. नर्सरी व्यवस्थापनाच्या प्रत्यक्ष प्रात्यक्षिकात कोकोपीट, वर्मी कम्पोस्ट, जैविक खते व जैविक बुरशीनाशकांचा वापर करून माध्यम तयारी, प्रो-ट्रेमधून रोपे तयार करणे व बियाणे पेरणी याचा अनुभव शेतकऱ्यांना देण्यात आला. तसेच अन्नद्रव्य व्यवस्थापनात पीकनिहाय खत मात्रेचे गणित, पीपीएम द्रावण तयार करणे व ठिबकद्वारे फर्टिगेशन पद्धती याची माहिती देण्यात आली. प्रशिक्षणाचा एक भाग म्हणून शेतकऱ्यांना कोलदा येथील प्रगतिशील शेतकरी राजु पटेल यांच्या शेतावर शैक्षणिक भेट देण्यात आली. येथे मंडप पद्धतीत तोंडली लागवडीचे यशस्वी उदाहरण पाहून शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष अनुभव घेतला तसेच पटेल यांच्यासोबत आव्हाने, विपणन व नफ्याबाबत चर्चा केली. कार्यक्रमात राजेंद्र दहातोंडे, वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र, नंदुरबार यांनी भाजीपाला लागवडीचे महत्त्व व व्याप्ती स्पष्ट केली. दिपक पटेल, प्रकल्प संचालक आत्मा, नंदुरबार यांनी ट्रेलिस भाजीपाला लागवडीतील संधींबाबत मार्गदर्शन केले. डॉ. वैभव गुर्वे, विषयतज्ज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, नंदुरबार यांनी ट्रेलिस लागवडीची सर्व माहिती दिली. पद्माकर कुंदे, विषयतज्ज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, नंदुरबार यांनी किड व रोग व्यवस्थापनाविषयी माहिती दिली तर राजेश भावसार, शेत व्यवस्थापक, यांनी मंडपाची रचना व उभारणी याविषयी मार्गदर्शन केले. तसेच आहिर व सोनवणे (IGS) यांनी प्रशिक्षणाचे समन्वयन केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी किरण मराठे व आरती देशमुख यांनी सहाय्यक म्हणून महत्त्वाची मदत केली. कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला असून शेतकऱ्यांनी मंडप शेती तंत्रज्ञान स्वीकारण्याविषयी उत्साह व्यक्त केला. शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढविणारे हे प्रशिक्षण ठरले असून आयोजक संस्थांकडून पुढील तांत्रिक मदत व शेतभेटींची हमी देण्यात आली.