*नंदुरबार येथे समस्त हिंदुत्ववादी संघटनाच्या वतीने विशेष व्याख्यानाचे आयोजन,भगव्या आतंकवादाचा बागुलबुवा पसरवणार्यांना हिंदू समाजच अद्दल घडवेल,विक्रम भावे,'दाभोलकर हत्या आणि मी' पुस्तका

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदुरबार येथे समस्त हिंदुत्ववादी संघटनाच्या वतीने विशेष व्याख्यानाचे आयोजन,भगव्या आतंकवादाचा बागुलबुवा पसरवणार्यांना हिंदू समाजच अद्दल घडवेल,विक्रम भावे,'दाभोलकर हत्या आणि मी' पुस्तका
*नंदुरबार येथे समस्त हिंदुत्ववादी संघटनाच्या वतीने विशेष व्याख्यानाचे आयोजन,भगव्या आतंकवादाचा बागुलबुवा पसरवणार्यांना हिंदू समाजच अद्दल घडवेल,विक्रम भावे,'दाभोलकर हत्या आणि मी' पुस्तकाचे लेखक*
नंदुरबार(प्रतिनिधी):-भगव्या आतंकवादाचा बागुलबुवा पसरवण्यासाठी मागील काही वर्षांत अनेक केसेस मध्ये खऱ्या आरोपीना मोकाट सोडून विनाकारण निष्पाप हिंदूंचे बळी ज्यांनी घेतले, तसेच अनेक हिंदू कुटुंबाची आयुष्य उध्वस्त केली, त्या सर्वांचे कारनामे आता बाहेर पडू लागले आहेत. अखेर सत्य सर्वांसमोर येणारच आहे, त्यामुळे भगव्या आतंकवादाचा बागुलबुवा पसरवून संपूर्ण हिंदू समाजाला ज्यांनी बदनाम केले अशाना हिंदू समाजच अद्दल घडवेल, यावर माझी ठाम श्रद्धा आहे, असे परखड विधान 'दाभोलकर हत्या आणि मी' या पुस्तकाचे लेखक विक्रम भावे यांनी केले. नंदुरबार येथील अग्रवाल भुवन येथे समस्त हिंदुत्ववादी संघटना आयोजित 'भगव्या आतंकवादाचे फेक नॅरेटिव्ह' या विषयावरील विशेष व्याख्यानात ते बोलत होते. या कार्यक्रमाला हिंदु जनजागृती समितीचे उत्तर महाराष्ट्र संघटक प्रशांत जुवेकर यांनीही संबोधित केले.
आपल्या विषयात विक्रम भावे पुढे म्हणाले की, डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात ‘सीबीआय’ने माझ्यावर आणि अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांच्यावर खोटे आरोप लावून आमचा मानसिक छळ केला; पण मी डगमगलो नाही. ज्या खोट्या पुराव्यांच्या आधारावर आरोपपत्र सिद्ध झाले, ते पहाता हा खटला केवळ मृत व्यक्तीचे ‘मोठे नाव’ असल्यामुळेच उभा राहिला. पोलिसांना कुणालाही पकडून शिक्षा द्यावीच लागते, हीच यंत्रणांची मानसिकता झाली आहे. वर्ष 2009 मध्ये गोवा येथे झालेल्या एका स्फोटात निर्दोष असतानाही केवळ हिंदुत्वाचे कार्य करतो यासाठी माझ्यासारख्या अजून 5 जणांना अटक केली गेली. 4 वर्षे कारावास भोगल्यानंतर आमची निर्दोष मुक्तता झाली. माझ्यासारख्या अनेक निरपराध हिंदूंची आयुष्य उध्वस्त करणाऱ्या, हिंदूंना आतंकवादी ठरवण्याचे पाप करणाऱ्या तत्कालीन हिंदुद्रोही राज्यकर्ते आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यावर वर्तमान राज्य सरकारने कठोर कारवाई करावी, तरच असे धाडस ते पुन्हा करणार नाहीत. यावेळी नंदुरबार येथील राजस्थानी चौधरी समाजचे ओमप्रकाश चुनीलाल आणि त्यांचे सहकारी, हिंदु सेवा सहाय्य समिती, नंदुरबार जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष आणि सर्व वकील बांधव, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, तळोदा तालुक्यातील हिंदु राष्ट्र सेना, जय श्रीराम सोशल ग्रुप, पतंजली परिवार, यांच्या वतीने मान्यवर विक्रम भावे आणि प्रशांत जुवेकर यांचा सत्कार करण्यात आला. व्याख्यानानंतर अनेकांनी पुस्तकाचे लेखक विक्रम भावे यांच्याशी संवाद साधला आणि त्यांच्यावरील अत्याचारांविषयी जाणून घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुमित परदेशी यांनी केले आणि आभार प्रदर्शन सतीश बागुल यांनी केले. कार्यक्रमाचा लाभ शेकडो धर्मप्रेमी नागरिकांनी घेतला.