*देवरे विद्यालयातर्फे 'मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत कृती कार्यक्रमातील' विविध विषयांवर प्रभात फेरीद्वारे जनजागृती*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*देवरे विद्यालयातर्फे 'मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत कृती कार्यक्रमातील' विविध विषयांवर प्रभात फेरीद्वारे जनजागृती*
*देवरे विद्यालयातर्फे 'मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत कृती कार्यक्रमातील' विविध विषयांवर प्रभात फेरीद्वारे जनजागृती*
नंदुरबार(प्रतिनिधी):-तालुक्यातील आत्माराम धवळू देवरे माध्यमिक विद्यालयाद्वारे विखरण गावातून ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासामध्ये पंचायतराज संस्थेचे मोठे योगदान आहे. पंचायत राज विविध कार्यक्रम व योजना राबवीत असते. पंचायत राज संस्थेतर्फे राबवित येणाऱ्या विविध योजनांची प्रभावी व जलद गतीने अंमलबजावणी करण्याच्या हेतूने शेवटच्या घटकापर्यंत या योजना प्रभावीपणे पोहोचाव्यात. या उद्देशाने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान नंदुरबार जिल्ह्यात राबवली जात आहे. सदर योजनेमध्ये मुख्य घटक सुशासनयुक्त पंचायत, सक्षम पंचायत, जन समृद्ध, स्वच्छ व हरित गाव निर्मिती करणे, मनरेगा व इतर योजनांचे अभिसरण, गावपातळीवरील संस्था सक्षमीकरण, उपजीविका विकास, सामाजिक न्याय लोकसहभाग व श्रमदान माध्यमातून लोक चळवळ निर्माण करणे याविषयी जनसामान्यांना प्रबोधन व्हावे या हेतूने गावातून प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. विखरण गावातील चौका- चौकात विद्यार्थ्यांनी घोष वाक्यांच्या गजरात माहिती दिली मुख्याध्यापक डी.डी. साळुंके यांच्या मार्गदर्शनाने प्रभात फेरीमध्ये इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसह उपशिक्षक सी.व्ही. नांद्रे, एम.डी. नेरकर, वाय.डी. बागुल, ए.एस. बेडसे, एम.एस. मराठे, एस.एच.
गायकवाड, व्ही.बी. अहीरे, तसेच डी.बी. पाटील, एस.जी. पाटील एच.एम. खैरनार यांनी परिश्रम घेतले.