*कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई यांची बैठक यशस्वी संपन्न, बैठकी नंतर शासनाने काढलेल्या जीआर ची केली होळी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई यांची बैठक यशस्वी संपन्न, बैठकी नंतर शासनाने काढलेल्या जीआर ची केली होळी*
*कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई यांची बैठक यशस्वी संपन्न, बैठकी नंतर शासनाने काढलेल्या जीआरची केली होळी*
मुंबई(प्रतिनिधी):-कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई संलग्न प्रतिनिधी मंडळ, कार्यकारणी, कुणबी युवा मंडळ, कुणबी विवाह मंडळ, कुणबी महिला मंडळ, तालुका व विभागीय शाखा, कुणबी जिल्हा समन्वय समिती, विविध कुणबी संघटना 7 सप्टेंबर 2025 सकाळी 11 वा. मुलुंड येथील कुणबी वसतिगृह प्रबोधन हॉल येथे, संघाध्यक्ष अनिल नवघणे यांच्या अध्यक्षतेखाली कुणबी समाजाची तातडीची बैठक अत्यंत उत्साहात व प्रचंड संख्येने उपस्थित असलेल्या बांधवांच्या साक्षीने यशस्वीरीत्या पार पडली. या बैठकीस सर्व शाखा, विभाग, विविध संघटना तसेच सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सभेत राजापूर तालुक्याच्या वतीने शाखा अध्यक्ष शिवाजी तेरवणकर यांनी आपले मत मांडले आणि योग्य त्या सूचना केल्या त्याच प्रमाणे संघाचे माजी सचिव अरविंद डाफळे यांनी आपले मत व्यक्त केले. तसेच राजापूर तालुक्यातून अशोक वालम, रविंद्र बावकर, रविंद्र मटकर, ऍड सुभाष बाने, संतोष चौगुले, मधुकर तोरस्कर यांनी विधायक सूचना मांडल्या.
संघाच्या आदेशानुसार शाखेच्या वतीने आंदोलनाची तयारी बाबत लवकरच समाज बांधवांची जाहीर बैठक आयोजित करून पुढील माहिती दिली जाईल. येत्या काळात मराठा समाजाकडून होणाऱ्या घुसखोरीला परतवून लावण्यासाठी मुंबई व कोकणातील कुणबी बांधव सज्ज राहतील, कुणबी समाजोन्नती संघ व इतर सर्व कुणबी संघटना एकत्र येऊन संयुक्त लढा देतील, समस्त कुणबी बांधवांनी संघटित होऊन ओबीसींच्या हक्कांसाठी सक्षम लढा द्यायचा आहे, येणाऱ्या पिढ्यांचे अस्तित्व व ओळख टिकवण्यासाठी सर्वांनी संघाच्या मार्गदर्शनाखाली आक्रमक आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवावा, OBC मध्ये घुसखोरीला प्रखर विरोध – सरसकट कुणबी दाखले देणे बंद करावे. हैदराबाद गॅजेट्सप्रमाणे जो GR काढला आहे त्याला कुणबी समाजाचा तीव्र विरोध आहे. सदर बैठकीला राजापूर तालुक्यातील समाज बांधव बहुसंख्येने सहभागी होऊन सभा यशस्वी केल्याबद्दल सर्व समाज बांधवांचे आभार मानण्यात आले.



