*जी टी पाटील महाविद्यालयात आयुष्यमान भारत योजनेवर प्रशिक्षणाचे आयोजन*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*जी टी पाटील महाविद्यालयात आयुष्यमान भारत योजनेवर प्रशिक्षणाचे आयोजन*
*जी टी पाटील महाविद्यालयात आयुष्यमान भारत योजनेवर प्रशिक्षणाचे आयोजन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-येथील जी टी पाटील महाविद्यालयात सिव्हिल हॉस्पिटल, जिल्हा परिषद व तहसील कार्यालय नंदुरबार, अंतर्गत गुणवत्ता विभाग, राष्ट्रीय छात्र सेना, राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने, व महाविद्यालयाचे प्राचार्य तथा क. ब. चौ. उ.म. वि, जळगावचे व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. एम.जे. रघुवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली आयुष्यमान भारत योजने संदर्भात विद्यार्थी व कर्मचारी यांच्यासाठी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. नंदुरबार जिल्हा रुग्णालय येथील राहुल चव्हाण यांनी विद्यार्थी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करत आपल्या मोबाईलद्वारे आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड आपण स्वतः कशा पद्धतीने घरीच काढू शकता या संदर्भातले सखोल मार्गदर्शन केले. तसेच डॉ. चेतनकुमार देसले यांनी या योजने संदर्भात लाभ घेण्यासाठी कोणत्या टप्प्यांची गरज पडते आणि कुठल्या महत्त्वाच्या कागदपत्रांची गरज पडते यावर सखोल मार्गदर्शन केले. जुलै 2023 च्या शासनाच्या जी.आर. नुसार महात्मा फुले जीवनदायी योजना व आयुष्यमान भारत योजना यांचे एकत्रीकरण करण्यात आले व त्यामुळे आता सर्व सामान्य जनता पाच लाख रुपये पर्यंतचा आरोग्य विमाचा लाभ घेऊ शकते. प्रात्यक्षिकेद्वारे विद्यार्थ्यांना आपल्या मोबाईलवर आयुष्यमान भारत योजनेचे ॲप कसे डाऊनलोड करावे व त्यात माहिती कशी भरून कार्ड कसे बनवावे यासंदर्भात संपूर्ण प्रात्यक्षिक देण्यात आले. प्रशिक्षणाच्या आयोजन करण्यामागील हेतू या शासनाच्या योजनेची इथंबूत माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचावी हा आहे. यात राष्ट्रीय छात्र सेनेचे छात्रसैनिक राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक व इतर विद्यार्थी असे एकूण 300 विद्यार्थ्यांनी व कर्मचारी या प्रशिक्षणाचा लाभ घेतला. विद्यार्थ्यांच्या शंकेचे निरसन करण्यात आले. व्यासपीठावर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ एस पी पाटील, संस्थेचे समन्वयक डॉ. एम एस रघुवंशी, आरोग्य निरीक्षक सी. जी. बोरसे, तहसील कार्यालयाचे संदीप वाडीले, आरोग्य सेवक विलास शिंदे एसजी शेलार व वसईकर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय छात्रसेना अधिकारी लेफ्ट. डॉ. विजय चौधरी, अंतर्गत गुणवत्ता विभाग समन्वयक डॉ एम आर पाटील, राष्ट्रीय सेवा योजनेचे अधिकारी डॉ सुलतान पवार व सहाय्यक अधिकारी, डॉ डी बी देवरे, प्रा जे सी पाटील व महिला अधिकारी डॉ संगीता पिंपरे यांनी सहकार्य केले.