*‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’, जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन-उदयकुमार कुसुरकर*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’, जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन-उदयकुमार कुसुरकर*
*‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’,जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन-उदयकुमार कुसुरकर*
नंदुरबार(प्रतिनिधी):-‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ प्रभावीपणे राबवण्यासाठी आज 3 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत जिल्हा परिषद येथील याहामोगी सभागृहात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले, असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.) उदयकुमार कुसुरकर यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे. ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ सन 2025-26 या आर्थिक वर्षापासून राबविण्यात येत असून अभियान शासनाचा एक महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे. याचा मुख्य उद्देश जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतींची कार्यक्षमता वाढवून त्यांना प्रोत्साहन देणे हा आहे. या अभियानामुळे शासकीय योजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावी आणि जलदगतीने होऊन त्याचा लाभ ग्रामीण भागातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचेल. यातून ग्रामीण लोकांचे जीवनमान सुधारण्यास मदत होईल. या अभियानांतर्गत, ग्रामपंचायतींमध्ये लोकांचा सहभाग वाढवणे, ग्रामीण नागरिकांना सहज सेवा पुरवणे, तसेच आरोग्य, शिक्षण, उपजीविका आणि सामाजिक न्याय यासारख्या क्षेत्रांमध्ये ग्रामपंचायतींचा सहभाग वाढवणे अपेक्षित आहे. या कार्यशाळेस जिल्ह्यातील मान्यवर लोकप्रतिनिधी, जिल्हास्तरीय खातेप्रमुख, तालुकास्तरीय गटविकास अधिकारी, सहायक गटविकास अधिकारी, तालुकास्तरीय खातेप्रमुख, विस्तार अधिकारी, तसेच 2022-23 आणि 2023-24 मधील ‘आर.आर.आबा सुंदर गाव पुरस्कार’ प्राप्त ग्रामपंचायतींचे सरपंच आणि अधिकारी सहभागी होणार आहेत, असेही उपमुख्य कार्यकारी अधिकारी कुसुरकर यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.