*शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीला सलग तिसऱ्यांदा खूप चांगले उच्च मानांकन-शिक्षण क्षेत्रात आणखी एक सोनेरी यश*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीला सलग तिसऱ्यांदा खूप चांगले उच्च मानांकन-शिक्षण क्षेत्रात आणखी एक सोनेरी यश*
*शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीला सलग तिसऱ्यांदा खूप चांगले उच्च मानांकन-शिक्षण क्षेत्रात आणखी एक सोनेरी यश*
नंदुरबार(प्रतिनिधी):-शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीला सलग तिसऱ्यांदा उच्च राष्ट्रीय मानांकन– शैक्षणिक गुणवत्ता सिद्ध करत महाराष्ट्रात अग्रस्थानी शिक्षण क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करत शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, समशेरपुर, नंदुरबार या महाविद्यालयाला महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबई कडून नामांकन प्रक्रियेत सलग तिसऱ्यांदा राष्ट्रीय मानांकन खूप चांगले या श्रेणीत मानांकन प्राप्त झालं आहे. या यशामुळे शताब्दी इन्स्टिट्यूटने आपली शैक्षणिक गुणवत्ता, संशोधनक्षमता आणि प्रगत शिक्षण पद्धती पुन्हा एकदा सिद्ध केल्या आहेत.
संस्थेचे प्राचार्य डॉ. पंकज एम चौधरी यांनी या यशाबद्दल प्रतिक्रिया देताना सांगितले, "हा सन्मान म्हणजे आमच्या संपूर्ण शिक्षकवर्ग, विद्यार्थ्यांचे परिश्रम आणि शैक्षणिक उंचीची दृढ बांधिलकी याचं फलित आहे. आमचं उद्दिष्ट केवळ परीक्षाफळापुरतं मर्यादित नसून, विद्यार्थ्यांना व्यावसायिक दृष्टिकोन देणं आणि औषधनिर्माण क्षेत्रात संशोधनाला चालना देणं हे आहे." संस्थेमध्ये सुसज्ज प्रयोगशाळा, आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण प्रणाली, प्रात्यक्षिक प्रशिक्षण, औद्योगिक सहकार्य आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जातो. यामुळे संस्थेने महाराष्ट्रात आणि राष्ट्रीय स्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
आमचा प्रयत्न नेहमीच शिक्षणाच्या सर्वोच्च स्तराकडे राहील." विद्यार्थ्यां मध्येही या यशामुळे प्रचंड उत्साह आहे. शिक्षणासाठी गुणवत्तेची खात्री हवी असणाऱ्या पालक व विद्यार्थ्यांसाठी शताब्दी इन्स्टिट्यूट एक विश्वासार्ह पर्याय बनत आहे. संस्थेच्या प्रगतीसाठी सातत्याने प्रयत्न करणारे संस्थेचे अध्यक्ष सौ. योगिता गणेश पाटील सचिव गणेश गोविंद पाटील आणि प्राचार्य डॉ. पंकज एम चौधरी यांनी यशाचे श्रेय शिक्षक व विद्यार्थ्याना देत कौतुक केले.